Trending News : किमान 63 लाख पगार आणि कुठूनही काम करण्याची संधी; सोशल मीडियावर होतेय या बॉसची चर्चा
Gravity Payments Company : मनासारखा जॉब मिळावा असं प्रत्येकाचं स्वप्नं असतं. पण हेच स्वप्नं जर सत्यात उतरलं तर..जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Gravity Payments Company : आजकालच्या धावपळीच्या युगात तसा मनासारखा जॉब मिळणं कठीणच. प्रत्येकजण नोकरीच्या शोधात शहरात येत असताना अनेक संकंटांचा सामना करावा लागतो. अशातच प्रत्येकाला आपल्या मनासारखा जॉब हवा असतो. त्याचबरोबर मनासारखा पगार मिळाला तर त्याहूनही सोनं होतं. अशा गोष्टी फक्त आपण स्वप्नातच पाहू शकतो. कारण प्रत्यक्षात इतकी सुविधा कोणती कंपनी देणार हाही प्रश्न आहेच. पण, जर का आम्ही तुम्हाला सांगितलं की या जगात असाही एक जॉब आहे तिथे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जॉब करता येतो तसेच त्या बदल्यात तुम्हाला कित्येक पटींनी अधिक मोबदला देखील मिळतो. तर तुमचा विश्वास बसणार आहे का? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेतील ग्रॅव्हिटी पेमेंट्स ही एक क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग कंपनी आहे. याच कंपनीची चर्चा सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात होतेय. याचं कारण असं की, ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षाचा तब्बल 63.7 लाख रूपये पगार आणि वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा देते. या कंपनीचा मालक डॅन प्राइस (Dan Price) यानेच आपल्या कर्मचाऱ्यांना ही सुविधा दिली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा बॉस प्रचंड चर्चेत आहे. 'बॉस असावा तर असा' अशा कमेंट्स डॅन प्राइस यांना मिळतायत.
My company pays an $80k min wage, lets people work wherever they want, has full benefits, paid parental leave, etc.
— Dan Price (@DanPriceSeattle) August 8, 2022
We get over 300 applicants per job.
"No one wants to work" is a hell of a way of saying "companies won't pay workers a fair wage and treat them with respect."
डॅन प्राइसने (Dan Price) या आधीही आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याकरीता स्वत:चे घर विकले होते. त्यानंतर तो चर्चेत आला होता. विशेष म्हणजे त्याचा पगार आणि त्याच्या कर्मचाऱ्यांचा पगार सारखाच आहे. कर्मचाऱ्याला भरघोस पगार देण्यावरुन त्याच्यावर सातत्याने टीका केली जाते.
सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जण म्हणतात की, कर्मचाऱ्यांना इतका पगार देणे योग्य नव्हे तर काही जण या बॉसचं कौतुक देखील करतायत.
महत्वाच्या बातम्या :
- Marriage In Air Viral Video : 400 फूट उंचीवर हवेत या जोडप्याने लग्न केले! व्हिडीओ पाहून सारेच हादरले
- Fetus Inside Egyptian Mummy : 2000 वर्ष जुन्या इजिप्शियन ममीच्या पोटात 28 महिन्यांचा गर्भ, आतापर्यंत कसा राहिला सुरक्षित?
- Egyptian Mummy : CT scan च्या मदतीने तीन हजार वर्षांपूर्वीच्या 'ममी'चं गूढ उलघडणार, इटलीतील प्रयोग