Vaishali Thakkar Suicide : अभिनेत्री वैशाली ठक्करच्या मृत्यूनंतर तिची इंस्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल; पोलिस म्हणाले...
Vaishali Thakkar Suicide : वैशालीच्या आत्महत्येवर इंदूरचे एसीपी मोतीउर रहमान तपास करीत आहेत. पोलिसांना वैशालीच्या रूममध्ये एक सुसाईड नोट देखील सापडली आहे.
Vaishali Thakkar Suicide : हिंदी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) हिने रविवारी तिच्या इंदूर येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याने संपूर्ण देश हादरला आहे. मात्र, वैशालीने आत्महत्या का केली हा प्रश्न सर्वांनाच पडला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान वैशालीच्या मृत्यूने तिच्या इन्टाग्रामवरच्या पोस्टकडे सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
वैशालीने 7 दिवसांपूर्वी ही पोस्ट टाकली होती. या पोस्टला तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले होते की, "जिसका बंदा/बंदी ना हो वो क्या करे," यावर तिनेच दिलेल्या उत्तरात लिहिले होते की,"वो पंखा घुमाये." दरम्यान या पोस्टने सर्वांनाच धक्का बसला आहे.
वैशालीच्या आत्महत्येवर इंदूरचे एसीपी मोतीउर रहमान तपास करीत आहेत. पोलिसांना वैशालीच्या रूममध्ये एक सुसाईड नोट देखील सापडली आहे.
Indore, MP | TV actor Vaishali Takkar dies by suicide
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) October 16, 2022
We received info at Tejaji Nagar PS that TV actor Vaishali Takkar hanged herself to death late last night. Recovered suicide note suggests that she was stressed, was being harassed by former boyfriend. Probe on: ACP M Rahman pic.twitter.com/LvXAWQSqhf
इंदूरचे एसीपी मोतीउर रहमान यांनी सांगितले की, वैशाली ठक्करची एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये तिचा जुना प्रियकर तिला त्रास देत होता. त्रास देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. वैशाली ही उज्जैनमधील महिदपूर येथील रहिवासी असून ती एक वर्षापासून इंदूरमध्ये राहत होती. तिच्या खोलीत सापडलेल्या सुसाईड नोटवरून असे दिसते की ती तणावात होती आणि आधीच्या बॉयफ्रेंडकडून तिचा छळ होत होता.
लग्नाबाबत केला होता खुलासा
वैशालीचे गेल्या वर्षी 26 एप्रिल रोजी केनियातील दंत शल्यचिकित्सक डॉ. अभिनंदन यांच्याशी साखरपुडा झाला होता. जवळच्या लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याची माहिती अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करून दिली. दोघेही जून 2021 मध्ये लग्न करणार होते. मात्र, अभिनेत्रीने एका महिन्यानंतर लग्नाची तारीख पुढे ढकलली. वैशालीने आपल्या निर्णयामागे कोरोना वाढीचे कारण दिले होते. एका मुलाखतीत वैशाली म्हणाली होती की, 'कोरोनामुळे अनेक लोक आपला जीव गमावत असताना अशा परिस्थितीत मी लग्न करू शकत नाही. पुढच्या वर्षी जर परिस्थिती चांगली झाली तर आम्ही लग्न करू.
महत्वाच्या बातम्या :