एक्स्प्लोर

Vaishali Thakkar Suicide : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्करची आत्महत्या; राहत्या घरात घेतला गळफास

TV Actress Vaishali Thakkar Suicide : प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्करने आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

TV Actress Vaishali Thakkar Suicide : टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) हिने आत्महत्या केली आहे. अभिनेत्रीने इंदूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वैशालीच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. मात्र, वैशालीने आत्महत्या का केली हा प्रश्न सर्वांनाच पडला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.   

पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली 

वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षांपासून टीव्हीपासून दूर होती आणि तिच्या मूळ गावी इंदूरमध्ये राहत होती. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. अभिनेत्रीने गळफास घेण्याआधी एक चिठ्ठीही लिहिली होती. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. मात्र, या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात पोलिसांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याच्या संशयावरून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असल्याचं बोललं जात आहे. 

'या' मालिकांमध्ये केलं काम 

वैशाली ठक्कर प्रसिद्ध शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मध्ये संजनाची भूमिका साकारताना दिसली होती. या शोमधून तिला चांगली ओळखही मिळाली. यानंतर तिने 'ससुराल सिमर का' (Sasural Simar Ka) या शोमध्ये अंजलीची भूमिका साकारली होती. वैशालीला गोल्डन पेटल अवॉर्डमध्ये नकारात्मक भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. या शोनंतर ती 'ये वादा रहा', 'ये है आशिकी', 'ससुराल सिमर का', 'सुपर सिस्टर', 'लाल इश्क' आणि 'विष या अमृत' यांसारख्या शो मध्ये दिसली. वैशाली शेवटची 2019 च्या मनमोहिनी शोमध्ये दिसली होती. वैशालीने टीव्हीशिवाय चित्रपटांमध्येही काम केले होते. ती मूळची उज्जैनमधील महिदपूरची होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशालीची 2021 मध्ये एप्रिल महिन्यात कुटुंबीय आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत एंगेजमेंट झाली होती. मात्र, एका महिन्यानंतरच वैशालीने होणाऱ्या पतीशी लग्न करणार नसल्याचे सांगितले. मात्र, एंगेजमेंट तुटण्याचे कारण अद्याप समोर आले नाही.

महत्वाच्या बातम्या : 

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'च्या मंचावर सिद्धार्थ-कियाराच्या नात्याचा उलगडा; 'वीकेंडचा वार' ठरला खास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget