एक्स्प्लोर

Vaidehi Parashurami : जेव्हा कामाचं कौतुक करण्यासाठी तब्बू फोन करते..., अभिनेत्री वैदेही परशुरामीने सांगितली आयुष्यातली गोड आठवण

Vaidehi Parashurami : अभिनेत्री वैदेही परशुरामी ही तिच्या कामामुळे नेहमचीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. नुकतच वैदेहीने तिच्या आयुष्यातली गोड आठवण शेअर केली आहे.

Vaidehi Parashurami : अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) ही नुकतीच पोलीस फोर्स (Indian Police Force) या वेब सिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिच्या सिरिजमधून ती प्रेक्षकांच्या देखील पुन्हा एकदा पसंतीस पडली आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित या सिरिजमध्ये वैदेहीने महत्त्वाची भूमिका साकारलीये. नुकतच वैदेही तिच्या कामासंदर्भातली एक गोड आठवण शेअर केली आहे. वैदेही परशुरामी ही सिम्बा (Simba) या चित्रपटात साकारलेली आकृती दवे ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या तितकीच पसंतीस पडली. तिच्या या कामाचं तब्बूने (Tabbu) फोन करुन कौतुक केल्याचं वैदेहीने सांगितलं. 

कलाकारांनी नेहमीच त्यांच्या कामाचं कोणत्या दिग्गज कलाकाराने कौतुक केलेलं आवडतं. ती एक शाबासकी थाप असते अशी भावना कलाकारांची असते. असाच काहीसा अनुभव वैदेहीने शेअर केला आहे. एका मुलाखतीदरम्यान वैदेहीने ही आठवण सांगितली. हा अनुभव सांगतानाही वैदेही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. मराठी कलासृष्टीतील गुणी आणि गोड अशी वैदेहीची ओळख आहे. 

जेव्हा तब्बू फोन करुन कामाचं कौतुक करते

रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा या चित्रपटात वैदेहीने रणवीर सिंहसोबत मोठा पडदा गाजवला होता. तिच्या या भूमिकेचं तब्बूने फोन करुन कौतुक केलं होतं. आतापर्यंत तुझ्या कामासाठी तुला मिळालेली सर्वात चांगली प्रतिक्रिया कोणती? असा प्रश्न वैदेहीला या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता. यावर तिनं म्हटलं की, आतापर्यंत अनेकांनी मला माझ्या कामासाठी प्रतिक्रिया दिल्या आहेत,अनेकांन कौतुकाची थाप दिलीये. पण या सगळ्यात लक्षात राहिलेली प्रतिक्रिया ही तब्बूने मला दिली होती. माझं सिम्बा मधलं काम पाहून तिने मला थेट फोन केला होता. तेव्हा तिच्याशी बोलताना मी फक्त रडत होते. मी तब्बूच्या कामाची खूप मोठी चाहती आहे, त्यामुळे तिचा फोन येणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. 

तिचं काम मला खूप आवडतं

मी तब्बूचं काम अगदी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून पाहत आलेय. जेव्हा मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली तेव्हापासून तिचं काम पाहत आलेय. मला तिचं काम प्रचंड आवडतं.माझ्यासाठी तब्बू हे इन्स्पीरेशन आहे. तिच्या आजवरच्या सगळ्या भूमिका मला आवडतात. त्यामुळे तिने खास माझ्या कामाचं कौतुक करण्यासाठी मला फोन करणं ही गोष्ट मी कधीच विसरु शकत नाही, असंही वैदेहीने म्हटलं. 

ही बातमी वाचा : 

Yoigta Chavan Saorabh Choughule Wedding :  'जीव माझा गुंतला' म्हणत योगिता चव्हाण-अभिनेता सौरभ चौघुले अडकले विवाहबंधनात, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News 23 March 2025ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsSushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण समोर, सीबीआयच्य अंतिम अहवालात काय?100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha 23 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
29 की 30 मार्च? गुढीपाडवा नेमका कधी?
29 की 30 मार्च? गुढीपाडवा नेमका कधी?
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
रिया चक्रवर्तीला क्लीन चिट, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच; सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
Embed widget