(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vaalvi: वाळवी ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या
‘वाळवी’ या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), सुबोध भावे (Subodh Bhave), अनिता दाते-केळकर (Anita Date-Kelkar) आणि शिवानी सुर्वे (Shivani Surve) प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
Vaalvi: ‘वाळवी’या (Vaalvi) मराठी फिल्मच्या जागतिक डिजीटल प्रीमियरची घोषणा करण्यात आली आहे. पांडू, झोंबिवली, हर हर महादेव आणि टाइमपास 3 यांसारख्या ब्लॉकबस्टर मराठी फिल्म्स प्लॅटफॉर्मवर आणल्यानंतर झी 5 आता 24 फेब्रुवारी रोजी ‘वाळवी’चा प्रीमियर करण्यास सज्ज आहे. परेश मोकाशीने दिग्दर्शित केलेल्या या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), सुबोध भावे (Subodh Bhave), अनिता दाते-केळकर (Anita Date-Kelkar) आणि शिवानी सुर्वे (Shivani Surve) प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.
8.8 एवढे आयएमडीबी रेटिंग असलेली वाळवी ही सर्वोच्च रेटिंग प्राप्त झालेली मराठी फिल्म आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी या फिल्मला सारखीच दाद दिली. अनन्यसाधारण पटकथा, अनपेक्षित धक्के व वळणे आणि अभिनेत्यांची दमदार कामगिरी यांमुळे ही फिल्म प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरली. 24 फेब्रुवारी 2023 पासून बघा ‘वाळवी’ झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, 'वाळवीतील भूमिका माझ्यासाठी प्रायोगिक स्वरूपाची होती. मी या प्रकारची भूमिका पूर्वी केलेली नव्हती आणि तिला जो प्रतिसाद मिळाला त्याचा मला खरोखरच आनंद वाटतो. माझ्या दिग्दर्शकाने (परेशम) मला अभिनेता म्हणून माझ्या कक्षा रुंदावण्यात मदत केली. त्याने मला माझ्या ‘कंफर्ट झोन’बाहेर ओढले, याबद्दल मी कृतज्ञ आहे. या फिल्मची प्रशंसा केल्याबद्दल आणि फिल्मवर प्रेम केल्याबद्दल मी प्रेक्षकांचाही ऋणी आहे. आता वाळवीचा जागतिक डिजिटल प्रीमियर झी 5 वर होत असल्यामुळे जगभरातील व्यापक प्रेक्षकवर्गापुढे फिल्म पोहोचणार आहे. ही एक उत्तम लिहिलेली, धक्के देणारी ब्लॅक कॉमेडी आहे तसेच प्रेमातून घडणाऱ्या गुन्ह्यांकडे यात उपहासगर्भ दृष्टिकोनातून बघितले आहे. त्यामुळे लोकांनी या फिल्मकडे नमुना म्हणून बघावे असे मी म्हणेन.'
वाळवीचे दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी 'एलिझाबेथ एकादशी', 'चि. व चि. सौ. का.' असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसाठी आणले होते. या चित्रपटांनी फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर रसिक प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं. आता वाळवी ओटीटीवर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: