एक्स्प्लोर

कांतारा फेम ऋषभ शेट्टीचा डंका; दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टरचा पुरस्कार जाहीर

ऋषभ शेट्टीला (Rishab Shetty) दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International Film Festival) मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Rishab Shetty: अभिनेता ऋषभ शेट्टीनं (Rishab Shetty) त्याच्या कांतारा (Kantara) या चित्रपटामधील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील ऋषभनं केलं. या चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता ऋषभ शेट्टीला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (Dadasaheb Phalke International Film Festival) मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे CEO अभिषेक मिश्रा यांनी एका पत्राद्वारके ही माहिती दिली आहे. 

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा हा 20 फेब्रुवारीला पार पडणार आहे. हा पुरस्कार सोहळा मुंबईमधील ताज लँड एंड हॉटेलमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्यात ऋषभला मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टर  या पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे.  दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये अनेक कलाकारांना सन्मानित केलं जातं. 2019 मध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात केजीएफ फेम अभिनेता यशला सन्मानित करण्यात आलं. तर 2020 मध्ये अभिनेता किच्चा सुदिपला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मोस्ट प्रॉमिसिंग अॅक्टरचा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 

ऋषभ शेट्टीनं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

काही दिवसांपूर्वी ऋषभ शेट्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे काही फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करुन त्यानं लिहिलं, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची भेट प्रेरणादायी ठरली.  भारताला नवी दिशा देण्यासाठी मनोरंजन उद्योगाचे योगदान आणि प्रगतीशील कर्नाटक या विषयांवर चर्चा केली. #BuildingABetterIndia मध्ये योगदान दिल्याचा अभिमान आहे. तुमचे दूरदर्शी नेतृत्व आम्हाला प्रेरणा देते.'

कांताराला ठरला हिट 

कांतारा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटामध्ये ऋषभबरोबरच  अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी  यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

केजीएफ मधील यश आणि कांतारा फेम ऋषभ शेट्टीनं घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; शेअर केले फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील दोन युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील दोन युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 मे 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सWare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 19 May 2024TOP 25 : महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : बातम्यांचं अर्धशतक 19 एप्रिल 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाकडून पैसे वाटप? ठाकरे गटाच्या आरोपाने खळबळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील दोन युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
दोन दुचाकींची भीषण धडक, तिघांचा मृत्यू; एकाच कुटुंबातील दोन युवती ठार झाल्याने सर्वत्र हळहळ
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
IPL 2024 : आमचं काही आयुष्य आहे की नाही, रोहित शर्मा भडकला, ब्रॉडकास्टरला फटकारलं 
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
RCB ची प्लेऑफमध्ये एन्ट्री, विजय माल्ल्याकडून शुभेच्छा, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
पुणे अपघात, दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर; पोलिसांनी सांगितलं कारण
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
प्रभसिमरनचं अर्धशतक, विदर्भाच्या अथर्वची फटकेबाजी, जितेश शर्माचा फिनिशिंग टच, पंजाबचं हैदराबादसमोर 215 धावांचे आव्हान
Nashik : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक बालंबाल बचावला
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चालक बालंबाल बचावला
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
IPL 2024 : विराट कोहली यंदाचा षटकार किंग, अभिषेक शर्मा-निकोलस पूरनला टाकले मागे
Embed widget