Twitter Language War : अजय देवगण-किच्चा सुदीपची ‘हिंदी’वरून जुंपली, आता ट्विटरवर ट्रेंड होतंय ‘मराठी’! नेटकऱ्यांकडून ‘सिंघम’ ट्रोल!
Ajay Devgan-Kiccha Sudeep : वाद ‘हिंदी’ भाषेवरून सुरु झाला होता, मात्र आता ट्विटरवर ‘मराठी’ ट्रेंड होतंय. नेटकरी या वादावरून अभिनेता अजय देवगण याला ट्रोल करत आहेत.
Ajay Devgan-Kiccha Sudeep : सध्या ‘हिंदी’ भाषेच्या मुद्द्यावरून अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि साऊथ अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeep) यांच्यामध्ये ट्विटरवर चांगलीच तू तू-मैं मैं रंगली होती. मात्र, आता या वादात पूर्ण सोशल मीडिया सामील झाला आहे. एकीकडे वाद ‘हिंदी’ भाषेवरून सुरु झाला होता, मात्र आता ट्विटरवर ‘मराठी’ ट्रेंड होतंय. नेटकरी या वादावरून अभिनेता अजय देवगण याला ट्रोल करत आहेत.
‘हिंदी ही राजभाषा आहे’, असं म्हणणाऱ्या अजय देवगण याला नेटकरी बोल लगावत आहेत. प्रत्येक हृदयात मराठी भाषा असणाऱ्या मुंबईत राहून हिंदी भाषेचे गोडवे गाणाऱ्या अभिनेत्याला नेटकऱ्यांनी फटकारले आहे. सोशल मीडियावर सध्या ‘मराठी’ ट्रेंड होत आहे. नेटकरी यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा काय म्हणतायत नेटकरी...
नेमकं प्रकरण काय?
अलीकडेच किच्चा सुदीपने एका चित्रपटाच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये म्हटले होते की, ‘हिंदी आता राष्ट्रभाषा नाही.’ किच्चा सुदीपच्या या विधानाला अभिनेता अजय देवगणने प्रत्युत्तर देत ट्विट केले. अजयने सोशल ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्याने किचा सुदीपला सवाल केला की, जर हिंदी राष्ट्रभाषा नसेल तर साऊथ इंडस्ट्रीतील निर्माते त्यांचे चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करतात? यानंतर ट्विटरवर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला होता.
यानंतर किच्चा सुदीपनेही यावर अजय देवगणला उत्तर दिले. तो म्हणाला की, मला जे म्हणायचे होते, ते चुकीच्या अर्थाने तुमच्यापर्यंत पोहोचले आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता. मी माझ्या देशातील प्रत्येक भाषेचा आदर करतो. मला हा वाद उगाच अजून वाढवायचा नाही. भेटून यावर नक्कीच बोलू’.
हेही वाचा :
- Rashmika Mandanna : ‘जर्सी’च नाही, संजय लीला भन्साळींनाही दिलाय नकार! रश्मिकाने नाकारलेयत ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट!
- PHOTO : शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मॉडेलिंगकडे वळलेल्या समंथा प्रभूच्या ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
- Lagan : ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’, अभिनेत्री स्मिता तांबेच्या ‘लगन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
- Ajay Devgn VS Kiccha Sudeep : 'हिंदी राष्ट्रभाषा नसेल तर तुमचे चित्रपट डब करून का रिलीज करता? किच्चा सुदीपच्या वक्तव्यावर अजय देवगणचे प्रत्युत्तर