एक्स्प्लोर

Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!

Iran War Live News: इराणवरील हल्ल्यांसाठी लष्करी तळ वापरू न दिल्याबद्दल ट्रम्प यांनी ब्रिटनवरही टीका केली आहे, मात्र त्यांनी ब्रिटनला व्यापारावर निर्बंध आणण्याची कोणतीही थेट धमकी दिलेली नाही.

Iran War Live News: स्पेनने अमेरिकेला इराणवरील हल्ल्यांसाठी दक्षिण स्पेनमधील लष्करी तळ वापरण्यास बंदी घातली आहे. या निर्णयामुळे संतापलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनला भयानक  म्हणत त्यांच्याशी सर्व प्रकारचे व्यापारी संबंध तोडण्याची थेट धमकी दिली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांना असमर्थनीय आणि धोकादायक लष्करी हस्तक्षेप म्हटलं आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले. अमेरिकेला त्यांचे तळ वापरू देणे हे संयुक्त राष्ट्रांच्या (UN) चार्टरचे उल्लंघन ठरेल, असा युक्तिवाद स्पेनने केला. 

इराणवरील हल्ल्यांसाठी लष्करी तळ वापरू न दिल्याबद्दल ट्रम्प यांनी ब्रिटनवरही 'असहकार्य' केल्याची टीका केली आहे, मात्र त्यांनी ब्रिटनला व्यापारावर निर्बंध आणण्याची कोणतीही थेट धमकी दिलेली नाही.

युरोपियन युनियनचा (EU) अडथळा

स्पेन हा 'युरोपियन युनियन'चा (EU) सदस्य देश असल्यामुळे, आणि EU मध्ये वस्तूंची मुक्त वाहतूक चालत असल्यामुळे एखाद्या एकाच सदस्य देशावर व्यापार निर्बंध लादणे अमेरिकेसाठी अत्यंत गुंतागुंतीचे ठरणार आहे. जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनीही ट्रम्प यांना नुकतेच स्पष्ट केले आहे की, युरोपियन युनियनसोबतच्या कोणत्याही व्यापार करारात स्पेनचा समावेश असणे बंधनकारक आहे.

संरक्षण खर्चाचा (Defense Spending) वाद

ट्रम्प यांच्या या आक्रमक पवित्र्यामागे लष्करी तळांव्यतिरिक्त आणखी एक कारण आहे. ट्रम्प यांनी 'नाटो' (NATO) मित्र राष्ट्रांनी आपल्या 'जीडीपी'च्या (GDP) 5 टक्के खर्च संरक्षणावर करावा अशी मागणी केली होती, ज्याला स्पेन सरकारने विरोध केला आहे.

अमेरिकन प्रशासनाचा दावा  

ट्रम्प आणि अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांचा दावा आहे की, अमेरिकेला स्पेनच्या उत्पादनांवर कायदेशीररीत्या बंदी घालण्याचा (embargo) अधिकार आहे. मात्र, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीयर यांनी याबाबत लगेच स्पष्ट भूमिका घेण्याचे टाळले. दुसरीकडे, स्पेन सरकारने अमेरिकेला खासगी कंपन्यांची स्वायत्तता, आंतरराष्ट्रीय कायदा आणि EU-US मधील द्विपक्षीय करारांचा आदर राखण्याची आठवण करून दिली आहे.

दोन्ही देशांमधील मोठी आर्थिक उलाढाल

2025 च्या आकडेवारीनुसार, अमेरिका आणि स्पेनमध्ये मोठा व्यापार होतो. अमेरिकेने स्पेनला सुमारे 26 अब्ज डॉलरची उत्पादने निर्यात केली होती, तर स्पेनमधून 21 अब्ज डॉलरची आयात केली होती. यात स्पेनकडून प्रामुख्याने 'फार्मास्युटिकल उत्पादने आणि ऑलिव्ह ऑइल' अमेरिकेत येते.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
Iran vs Israel War Pakistan Fuel Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा पाकिस्तानला जबरदस्त धक्का, शाहबाज शरीफ यांचा टोकाचा निर्णय, सरकारी कामकाज 'वर्क फ्रॉम होम', शाळांनाही सुट्टी जाहीर
इराण-इस्रायल युद्धाचा पाकिस्तानला जबरदस्त धक्का, शाहबाज शरीफ यांचा टोकाचा निर्णय, सरकारी कामकाज 'वर्क फ्रॉम होम', शाळांनाही सुट्टी जाहीर
Donald Trump Iran War : मोठी बातमी: अमेरिका-इराण युद्ध थांबण्याचे संकेत, डोनाल्ड ट्रम्प यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले...
मोठी बातमी: अमेरिका-इराण युद्ध थांबण्याचे संकेत, डोनाल्ड ट्रम्प यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले...
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Embed widget