Titeeksha Tawade and Siddharth Bodke : रिल लाईफ ते रिअल लाईफ,अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिदार्थ बोडकेची लगीनघाई
Titeeksha Tawade and Siddharth Bodke : अभिनेत्री तितिक्षा यापूर्वी 'शाबास मिथू' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. शाबास मिथू हा सिनेमा भारतीय क्रिकेटर मिथाली राज हिच्या आयुष्यावर आधारित होता. या सिनेमात तापसी पन्नूची प्रमुख भूमिका होती. शिवाय तितिक्षानेही महत्वाची भूमिका बजावली होती. तर सिद्धार्थ बोडके याने अजय देवगणच्या 'दृश्यम 2'मध्ये सिद्धार्थ बोडकेने डेव्हिडची भूमिका साकारली होती.
![Titeeksha Tawade and Siddharth Bodke : रिल लाईफ ते रिअल लाईफ,अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिदार्थ बोडकेची लगीनघाई Titeeksha Tawade and Siddharth Bodke marathi serial Drushyam 2 Instagram Post Marathi News Titeeksha Tawade and Siddharth Bodke : रिल लाईफ ते रिअल लाईफ,अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिदार्थ बोडकेची लगीनघाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/09/057494c30e41d849420c032a20de02f41707458070031924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Titeeksha Tawade and Siddharth Bodke : मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawade) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तितिक्षा तावडे (Titeeksha Tawade) आणि दृश्यम 2 अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) यांचा विवाह लवकरच पार पडणार आहे. याबाबतची माहिती तितिक्षा आणि सिद्धार्थ दोघांनीही इन्स्टाग्राम (Instagram) पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. 'तू अशी जवळ रहा' या सिद्धार्थ आणि तितिक्षा एकत्रित पाहायला मिळाले होते. सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या माध्यमातून तितिक्षा आणि सिद्धार्थ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
View this post on Instagram
तितिक्षाची पोस्ट चर्चेत
अभिनेत्री तितिक्षा तावडे हिची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे. तिची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तितिक्षाने (Titeeksha Tawade) तिचा आणि सिद्धार्थचा (Siddharth Bodke) फोटो इन्स्टाग्रामला पोस्ट केला आहे. "त्याने मला डेटसाठी विचारले होते. पण त्याचा बदल केळवणमध्ये झाला" असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.
सिद्धार्थ बोडकेकडून इन्स्टा स्टोरी शेअर
दृश्यम 2 फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यानेही इन्स्टा स्टोरीवरुन लग्नाबाबतची माहिती दिली आहे. चाहते सिद्धार्थ आणि तितिक्षा यांना विवाहासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. सिद्धार्थच्या चाहत्यांनी इन्स्टाला अनेक स्टोरी शेअर केल्या आहेत. सिद्धार्थने 'दृश्यम 2'च्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली होती.
एका चाहत्यांने प्रतिक्रिया देताना लिहिले आहे की, मला याबाबत शंका होतीच आणि प्रत्यक्षातही तसेच होते.
तितिक्षा 'शाबास मिथू' सिनेमातून आली होती प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेत्री तितिक्षा यापूर्वी 'शाबास मिथू' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. शाबास मिथू हा सिनेमा भारतीय क्रिकेटर मिथाली राज हिच्या आयुष्यावर आधारित होता. या सिनेमात तापसी पन्नूची प्रमुख भूमिका होती. शिवाय तितिक्षानेही महत्वाची भूमिका बजावली होती. तर सिद्धार्थ बोडके याने अजय देवगणच्या 'दृश्यम 2'मध्ये सिद्धार्थ बोडकेने डेव्हिडची भूमिका साकारली होती. या शिवाय अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या श्री देवी प्रसन्न या सिनेमातही सिद्धार्थ झळकणार आहे. मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणारे तितिक्षा आणि सिद्धार्थ लवकरच वैवाहिक आयुष्याला सुरुवात करणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Urfi Javed Dressing Style : उर्फी जावेदचं नाव प्रत्येकाच्या तोंडात, पण या 5 अभिनेत्रींच्या अतरंगी पोषाखाने हैराण व्हायची वेळ आली!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)