(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...म्हणून 'The Family Man 2' या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली
'The Family Man 2' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दिग्दर्शक राज आणि डीके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे.
मुंबई : सप्टेंबर 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'The Family Man' वेब सीरिजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासूनच या सीरिजचा दुसरा सीजन कधी प्रदर्शित होतोय याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. काही दिवसांपूर्वीच 'The Family Man 2' च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दिग्दर्शक राज आणि डीके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे.
राज आणि डिके आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, आम्हाला माहित आहे की, फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहे. फॅमीली मॅनला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे धन्यवाद. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, 'The Family Man 2' ही सीरिज उन्हाळाच्या सुट्टीत अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. एक चांगली कलाकृती सादर करण्यासाठी आम्ही त्यावर आणखी मेहनत घेत आहे. आम्हाला खात्री आहे की, ती तुम्हाला नक्की आहे की ती तुम्हाला नक्की आवडेल".
गुप्तचर आधिकाऱ्याच्या भूमिकेत मनोज वाजपेयी या सीरिजमध्ये मनोज वाजपेयीने एका दमदार गुप्तचर आधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. श्रीकांत तिवारी नावाच्या एका व्यक्तीच्या भूमिकेत असणारा मनोज वाजपेयी आपली ओळख लपवून ठेवायचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. त्यानं अनेक सीक्रेट मिशन यशस्वी केलेले असतात. हे सर्व करत असताना व्यक्तीगत जीवनात त्याची कशी तारांबळ उडते ते मजेशीर पध्दतीनं दाखवण्यात आलं आहे.View this post on Instagram