एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Telly Masala : अंबानींची फाईव्ह स्टार वरात गुलाबी रंगात न्हाऊन निघाली ते अनंत-राधिकाच्या लग्नमंडपात अजय-अतुलचे सूर दुमदुमले ; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Sanju Rathod at Ambani Wedding : अंबानींची फाईव्ह स्टार वरात गुलाबी रंगात न्हाऊन निघाली; 'गुलाबी साडी' गाण्यावर वऱ्हाडी थिरकले
जगभरात ज्या सोहळ्याची चर्चा झाली तो सोहळा पुन्हा एकदा विशेष कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) या गाण्याने सिनेसृष्टीतल्या सगळ्यांनाच भुरळ घातली. अगदी माधुरीपासून ते अनेक दिग्गजांना या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. आता यातून अंबानी कुटुंब (Ambani Family) देखील सुटलेलं नाही. अनंत अंबानींच्या लग्नात थेट संजू राठोडने उपस्थिती लावली आणि अंबानी कुटुंबियांसह उपस्थितांनी गुलाबी साडी या गाण्यावर ठेका धरला.
Tejas Thackeray : अंबानींच्या लग्नात सुद्धा गुलाबी साडी आणि लाली लाल लालची हवा; मित्र तेजस ठाकरे पुन्हा थिरकले
मागील अनेक दिवसांपासून एक लग्न आणि त्या लग्नामुळे बरीच मंडळी वारंवार चर्चेत येत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) देखील काही मागे राहिले नाहीत. मित्राच्या संगीत सोहळ्यात बॉलीवूडकरांसह तेजस ठाकरे यांनी देखील ठेका धरला आणि त्यानंतर थेट सत्ताधाऱ्यांना राजकीय ठसकाच लागला. पण त्यातच आता तेजस ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) या गाण्यावर मित्राची वरात गाजवली.
Ajay-Atul : अनंत-राधिकाच्या लग्नमंडपात अजय-अतुलचे सूर दुमदुमले, दिग्गज गायकांची नव दाम्पत्यासाठी विशेष भेट
मुंबईत सध्या एका राजेशाही सोहळ्याचे साक्षीदार अनेक दिग्गज होत आहेत. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा लग्नसोहळा 12 जुलै रोजी पार पडला. रविवार 15 जुलै रोजी या सोहळ्याचा शेवटचा दिवस असून त्यांचे रिसेप्शन पार पडणार आहे. आतापर्यंत देशाच्या पंतप्रधानांसह ते जगभरातील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. विशेष म्हणजे या सोहळ्यात सुरांची जबाबदारी ही मराठमोळे गायक अजय-अतुल यांच्याकडे होती.
Bigg Boss Marathi 5 : 'दिवस ठरला, तारीख ठरली!' आता राडा होणार; पण त्याआधी कलर्स मराठीवरील दोन मालिका निरोप घेणार?
'कलर्स मराठी' (Colors Marathi) नुकतीच 'बिग बॉस मराठी'ची (Bigg Boss Marathi Season 5) घोषणा करण्यात आली आहे. येत्या 28 जुलै पासून होणार आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे या सिझनची बरीच चर्चा सुरु आहे. पण या सगळ्यात कलर्स मराठीवरील दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
Onkar Bhojane : ओंकार भोजनेनी साकारल्या भरत जाधवांच्या विविध व्यक्तिरेखा, व्यासपीठावर स्वत:ची सोन्याची अंगठी देत कौतुकानं थोपटली पाठ
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi HasyaJatra) या कार्यक्रमातून अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) हा घराघरांत पोहचला. त्यानंतर तो 'सरला एक कोटी' या सिनेमात देखील झळकला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तो प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला. सध्या तो कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' (Hastay Na Hasayalach Pahije) या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Dilip Prabhavalkar : दिलीप प्रभावळकरांच्या मनात आजही श्रीराम लागूंच्या पत्र आठवणींचा दरवळ, 'पत्रा पत्री'च्या प्रयोगांना उदंड प्रतिसाद
‘हसवाफसवी’ हे नाटकं पहिल्यानंतर डॉ. श्रीराम लागू (Shriram Lagu) यांनी दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. या पत्राच्या आठवणी आजही चांगलं काम करायला बळ देतात असं म्हणत, नाट्यरसिकांसाठी दिलीप प्रभावळकर यांनी खास पत्रप्रपंच आयोजित केला आहे. त्यांच्या या प्रपंचाला नाट्यरसिकांचाही उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रा पत्री’ या नावीन्यपूर्ण अभिवाचनाचे प्रयोग सध्या जोरदार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement