Tejas Thackeray : अंबानींच्या लग्नात सुद्धा गुलाबी साडी आणि लाली लाल लालची हवा; मित्र तेजस ठाकरे पुन्हा थिरकले
Tejas Thackeray : अनंत अंबानीच्या लग्नात तेजस ठाकरेंनी पुन्हा एकदा ठेका धरला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Tejas Thackeray Dance at Ambani Wedding : मागील अनेक दिवसांपासून एक लग्न आणि त्या लग्नामुळे बरीच मंडळी वारंवार चर्चेत येत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) देखील काही मागे राहिले नाहीत. मित्राच्या संगीत सोहळ्यात बॉलीवूडकरांसह तेजस ठाकरे यांनी देखील ठेका धरला आणि त्यानंतर थेट सत्ताधाऱ्यांना राजकीय ठसकाच लागला. पण त्यातच आता तेजस ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) या गाण्यावर मित्राची वरात गाजवली.
तेजस ठाकरे यांचा गुलाबी साडी या गाण्यावरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजू राठोडने आता थेट अंबानींच्या लग्नात उपस्थित राहत गुलाबी साडी हे गाणं गायलं. या गाण्यावर अनंत अंबानीच्या वरातीने चांगलाच ठेका धरला. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते तेजस ठाकरे यांच्या नृत्याने.
तेजस ठाकरेंचा 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स
संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्यावर लग्नासाठी उपस्थित असलेली मंडळी थिरकताना दिसली. त्यामध्ये तेजस ठाकरे यांनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे आता संगीत सोहळ्यानंतर तेजस ठाकरे यांना पुन्हा मित्राच्या लग्नात थिरकताना दिसले. तेजस ठाकरेंच्या या गाण्यावरुन आता पुन्हा एकदा राजकीय ठसका लागणार का हे पाहणं गरजेचं ठरेल.
View this post on Instagram
तेजस ठाकरेंचा 'ये लड़की,हाए,अल्लाह' गाण्यावर डान्स
तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली. या संगीत सोहळ्यात अंबानी कुटुंबियांसह अनेकांनी ठेका थरला. तेजस ठाकरे हे 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील ये 'लड़की, हाए, अल्लाह या गाण्यावर थिरकले.' त्यामध्ये तेजस ठाकरेंचाही समावेश आहे. सुशीलकुमार शिंदे यांचा धाकटा नातू वीर पाहारिया देखील तेजस ठाकरेंसोबत मंचावर आहे.
ही बातमी वाचा :