एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : 'दिवस ठरला, तारीख ठरली!' आता राडा होणार; पण त्याआधी कलर्स मराठीवरील दोन मालिका निरोप घेणार? 

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी कलर्सच्या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जातंय. 

Bigg Boss Marathi 5 : 'कलर्स मराठी' (Colors Marathi) नुकतीच 'बिग बॉस मराठी'ची (Bigg Boss Marathi Season 5) घोषणा करण्यात आली आहे. येत्या 28 जुलै पासून होणार आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे या सिझनची बरीच चर्चा सुरु आहे. पण या सगळ्यात कलर्स मराठीवरील दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. 

बिग बॉस मराठी सिझन 5मध्ये होस्टच्या खुर्चीत यंदा रितेश देशमुख बसणार आहे. हा सिझन 28 जुलैपासून संध्याकाळी 9.30 वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यासाठी कोणत्या मालिका बंद होणार याची उत्सुकता आधीपासूनच होती. पण आता कलर्स मराठी वाहिनीवरील काही कलाकारांनी त्यांच्या मालिकेच्या शेवटच्या दिवसांमधील शूटचे काही फोटो शेअर केले आहेत. 

कोणत्या मालिका होणार बंद?

कलर्स मराठी वाहिनीवर सध्या रमा राघव ही मालिका रात्री 9.30 ला प्रक्षेपित केली जाते. तसेच 10 वाजता पिरतीचा वणवा उरी पेटला ही मालिका प्रक्षेपित केली जाते. बिग बॉस हा कार्यक्रम एक तास असतो. त्यामुळे वाहिनीवरील दोन मालिका निरोप घेणार याची कल्पना प्रेक्षकांना होती. त्यातच आता या दोन्ही मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या सेटवरील काही फोटो शेअर करत मालिका लवकरच निरोप घेणार असल्याची हिंट प्रेक्षकांना दिली आहे. 

कलाकारांनी शेअर केले फोटो

रमा राघव या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या शेटे ही प्रमुख भूमिकेत आहे. तिने काही दिवसांपूर्वी तिच्या मालिकेती तिचा सहकलाकार आणि प्रमुख अभिनेता निखिल दामलेसोबत फोटो शेअर केला होता. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा फोटो टाकला होता. त्यावर तिने शेवटचे काही दिवस असं कॅप्शन दिलं आहे. त्याचप्रमाणे पिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेतील प्रमुख अभिनेता इंद्रनील कामत याने त्याची सहकलाकार आणि प्रमुख अभिनेत्री रसिकासोबत एक फोटो शेअर केला आहे. त्यावर त्याने देखील शेवटचे काही दिवस असं कॅप्शन दिलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Indraneil Kamat (@indraneil.kamat)

Bigg Boss Marathi 5 : 'दिवस ठरला, तारीख ठरली!' आता राडा होणार; पण त्याआधी कलर्स मराठीवरील दोन मालिका निरोप घेणार? 

त्यामुळे बिग बॉस मराठीसाठी रमा राघव आणि पिरतीचा वणवा उरी पेटला या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पण कोणती मालिका निरोप घेणार हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. 

ही बातमी वाचा : 

Onkar Bhojane : ओंकार भोजनेनी साकारल्या भरत जाधवांच्या विविध व्यक्तिरेखा, व्यासपीठावर स्वत:ची सोन्याची अंगठी देत कौतुकानं थोपटली पाठ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित

व्हिडीओ

ZP Election Result : जिल्हा परिषद निवडणुकीत मराठवाड्यात कुणाचा गुलाल, कोण बेहाल? Special Report
Pashchim Maharashtra Elecction : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report
ZP konkan Result : जिल्हा परिषदेत सिंधुदुर्ग राणेंचो, रत्नागिरी सामंतांची Special Report
Political Family Result : घराणेशाहीचा कुठे जय, कुठे पराजय? Special Report
Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara ZP Election Result : साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, भाजप विरोधी बाकांवर?
साताऱ्यात सत्तेच्या चाव्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे, राष्ट्रवादी- शिवसेनेच्या निर्णयाकडे लक्ष, सेना किंगमेकर  
BCCI Central Contract : टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं काय झालं? 
टीममध्ये स्थान मिळूनही ईशान किशन BCCI च्या केंद्रीय कराराच्या यादीतून बाहेर, रोहित आणि विराटचं काय?
Satej Patil: 'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'तर आम्ही विचार करु'! कोल्हापूर झेडपीला हसन मुश्रीफांसोबत 'समझोता एक्स्प्रेस' धावणार? सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना २०२६चा राजरत्न पुरस्कार घोषित
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
फॉर्च्यूनरचा चेंदामेंदा, पुण्याहून गुजरातला निघालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू संभाजी पाटीलचा अपघाती मृत्यू
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
ZP Eelction results: झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
झेडपी निवडणुकीत अजित दादांच्या राष्ट्रवादीचा मोठा विजय, पुण्यातही सर्वाधिक जागा; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
Embed widget