Onkar Bhojane : ओंकार भोजनेनी साकारल्या भरत जाधवांच्या विविध व्यक्तिरेखा, व्यासपीठावर स्वत:ची सोन्याची अंगठी देत कौतुकानं थोपटली पाठ
Hastay Na Hasayalach Pahije : ओंकार भोजनेने भरत जाधव यांच्या विविध व्यक्तिरेखा साकारल्यानंतर त्यांच्याकडून त्याला एक खास भेट देण्यात आली आहे.
![Onkar Bhojane : ओंकार भोजनेनी साकारल्या भरत जाधवांच्या विविध व्यक्तिरेखा, व्यासपीठावर स्वत:ची सोन्याची अंगठी देत कौतुकानं थोपटली पाठ Onkar Bhojane Hastay Na Hasayalach Pahije Bharat Jadhav give him his gold ring as special Gift Onkar Bhojane : ओंकार भोजनेनी साकारल्या भरत जाधवांच्या विविध व्यक्तिरेखा, व्यासपीठावर स्वत:ची सोन्याची अंगठी देत कौतुकानं थोपटली पाठ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/14/5bfa70cce34467426e2af49844519d7d1720943711753720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hastay Na Hasayalach Pahije : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi HasyaJatra) या कार्यक्रमातून अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) हा घराघरांत पोहचला. त्यानंतर तो 'सरला एक कोटी' या सिनेमात देखील झळकला होता. त्यानंतर पुन्हा एकदा तो प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला. सध्या तो कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील 'हसताय ना, हसायलाच पाहिजे' (Hastay Na Hasayalach Pahije) या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या कार्यक्रमात पाहुण्यांच्या खुर्चीत अल्का कुबल आणि भरत जाधव ही मंडळी बसली आहेत. पण सध्या या कार्यक्रम एका खास गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या कार्यक्रमात भरत जाधव यांनी ओंकारच्या कामाची पोचपावती त्याला व्यासपीठावर जाऊन दिली. या कार्यक्रमात अनेक खास गोष्टी सतत घडत असतात. अशीच एक खास गोष्ट नुकतीच या कार्यक्रमात घडली आहे. सध्या सोशल मीडियावर या गोष्टीची चर्चा सुरु आहे.
कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रदर्शित
नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. या प्रोमोमध्ये ओंकार भोजने भरत जाधव यांच्या विविध व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. त्याचं हे काम पाहून भरत जाधव देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे त्यांनी ओंकारच्या कामाचं कौतुक करत स्वत:च्या जवळची एक खास वस्तू देखील त्याला भेट म्हणून दिली.
भरत जाधव यांनी ओंकारला दिली सोन्याची अंगठी
ओंकार भरत जाधव यांच्या विविध व्यक्तिरेखा यावेळच्या स्किटमध्ये साकारल्या. यामध्ये गलगले, सही रे सही या नाटकातील भूमिका अशा वेगवेगळ्या भूमिकांचा समावेश होता. ओंकारने केलेल्या या व्यक्तिरेखांचं कौतुक स्वत: भरत जाधव यांनी मंचावर येऊन केलं. इतकचं नव्हे तर यावेळी त्यांनी ओंकारला एक खास भेट देखील दिली. ओंकारचं काम पाहून भरत जाधव यांनी स्वत:ची सोन्याची अंगठी ओंकारला भेट म्हणून दिली.
View this post on Instagram
‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या शोचे लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे यांनी केले. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीर सोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारांचा देखील समावेश आहे. हा शो शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर आणि कधीही #JioCinema वर तुम्ही पाहू शकता.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)