एक्स्प्लोर

Dilip Prabhavalkar : दिलीप प्रभावळकरांच्या मनात आजही श्रीराम लागूंच्या पत्र आठवणींचा दरवळ, 'पत्रा पत्री'च्या प्रयोगांना उदंड प्रतिसाद

Dilip Prabhavalkar : 'पत्रा पत्री' या अभिवाचनाचे जोरदार प्रयोग होत असून दिलीप प्रभावळकर हे खास पत्राच्या आठणीत रमले आहेत. 

Dilip Prabhavalkar : ‘हसवाफसवी’ हे नाटकं पहिल्यानंतर डॉ. श्रीराम लागू (Shriram Lagu) यांनी दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांच्या अभिनयाचं कौतुक करण्यासाठी पत्र लिहिलं होतं. या पत्राच्या आठवणी आजही चांगलं काम करायला बळ देतात असं म्हणत, नाट्यरसिकांसाठी  दिलीप प्रभावळकर यांनी खास पत्रप्रपंच आयोजित केला आहे. त्यांच्या या प्रपंचाला नाट्यरसिकांचाही उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. दिलीप प्रभावळकर लिखित ‘पत्रा पत्री’ या नावीन्यपूर्ण अभिवाचनाचे  प्रयोग सध्या  जोरदार  सुरु आहेत. 

या आगळ्यावेगळ्या प्रयोगासाठी ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे  यांची त्यांना  साथ  लाभली आहे.आज पत्रात्मक संवाद कालौघात मागे पडलेला असताना  बदामराजा प्रोडक्शन्स निर्मित ‘पत्रा पत्री’ हा रंगाविष्कार मंचावर येणं, त्याला  नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळणे हे निश्चितच उत्सुकता वाढवणारं आहे.माधुरी गवांदे, निनाद कर्पे याचे निर्माते आहेत.

श्रीराम लागू यांनी लिहलेल्या पत्राचा दरवळ

माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं या खेळाच्या आठवणी अनेकांच्या  स्मृतीरंजनात असतील. मात्र कालौघात हा खेळ हरवलायं  आणि ते पत्रसुद्धा. एक छोटा कागदाचा कपटा,पण  पत्रामध्ये, दोन शब्दांमध्ये, दोन रेषांमध्ये किती तरी अव्यक्त गोष्टी दडलेल्या असायच्या. हल्ली पत्रप्रपंच कमी झाला असला तरी काही पत्रांच्या आठवणींचा दरवळ मात्र मनात  चिरंतन दरवळतो. अभिनेते  दिलीप प्रभावळकर यांना डॉ. श्रीराम लागू यांनी लिहलेल्या पत्राचा दरवळ आणि त्याची आठवण आजही दिलीप प्रभावळकर यांच्या मनात रुंजी घालतायेत.  

दिलीप प्रभावळकरांनी काय म्हटलं?

दिलीप प्रभावळकर याविषयी म्हणाले, पत्रलेखनामधील ओलावा आणि आपलेपणाची अनुभूती रसिकांना देण्यासाठी ‘पत्रा पत्री’ चा प्रयोग करण्याचं ठरवलं. ‘प्रासंगिक आणि विडंबनात्मक पद्धतीचं लेखन या पत्रांमध्ये आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. अशा पाच कथा आम्ही अभिवाचनासाठी निवडल्या आहेत.’ तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा बनून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे पत्रांचं अभिवाचन करत आहेत. या ‘दृक आविष्कारा’चं दिग्दर्शन विजय केंकरे यांचं असून रंगावृत्ती नीरज शिरवईकर यांची आहे. संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाशयोजना  शीतल तळपदे तर  वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. 

ही बातमी वाचा : 

Ajay-Atul : अनंत-राधिकाच्या लग्नमंडपात अजय-अतुलचे सूर दुमदुमले, दिग्गज गायकांची नव दाम्पत्यासाठी विशेष भेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येच्युरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येच्युरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 5.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune :राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगितीABP Majha Headlines : 04.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSitaram Yechury Dies At 72 :  माकप नेते सिताराम येचुरी यांचं निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरच श्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येच्युरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येच्युरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Video: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Kavita Raut : सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
Embed widget