Vishakha Subhedar: 'नव्या सिरीअलमधून लगेचच इतका मोठा ब्रेक घेणं...'; विशाखा सुभेदारच्या पोस्टनं वेधलं लक्ष
‘शुभविवाह’ या मालिकेत विशाखानं (Vishakha Subhedar) रागिणी आत्या ही भूमिका साकारली.

Vishakha Subhedar: अभिनेत्री विशाखा सुभेदारला (Vishakha Subhedar) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामुळे विशाखाला विशेष लोकप्रियता मिळाली. ‘शुभविवाह’ या मालिकेत विशाखानं रागिणी आत्या ही भूमिका साकारली. आता या मालिकेबाबत विशाखानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
विशाखाची पोस्ट
विशाखानं सोशल मीडियावर पोस्टमध्ये लिहिलं, 'मिसिंग रागिणी..... शुभविवाह..! स्टारप्रवाह वर.. दुपारी दोन वाजता..! नव्या सिरीयल, नवीन भूमिकेतून, लगेचच इतका मोठा ब्रेक घेणं शक्य नसतं.. पण खुप आधीपासून ठरलेला हा दौरा..त्यामुळे या डेटला मी नसणार.. हे माहित असूनही इतकी महत्वाची भूमिका मला दिलीत... माझा हा दौरा तुम्ही adjust केलात.खरच तुमचे मना पासून आभार.. स्टार प्रवाह आणि आमचे producer महेश तागडे ह्यांचे ही आभार. रागिणी रंगवण..जीव ओतून करते आणि करत राहीन. मिसिंग रागिणी.' विशाखाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. विशाखा ही सध्या कुर्रर्रर्रर्र या नाटकांच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. कुर्रर्रर्रर्र या नाटकाच्या टीमनं काही दिवसांपूर्वी या नाटकाचा प्रयोग परदेशात सादर केला.
View this post on Instagram
विशाखाचे चित्रपट
फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन या कॉमेडी शोमध्ये विशाखानं काम केलं. तसेच विशाखा ही 'शुभविवाह' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मस्त चाललंय आमचं, ये रे ये रे पैसा-2, येड्यांची जत्रा या चित्रपटांमध्ये देखील विशाखानं काम केलं आहे. विशाखाचा कॉमेडी अंदाज नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो. विशाखा ही सध्या कुर्रर्रर्रर्र या नाटकामधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
विशाखाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. विशाखानं शेअर केलेल्या सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इन्स्टाग्रामवर (Instagram) जवळपास 90 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. विशाखा सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो देखील शेअर करत असते.
महत्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
