Fu Baai Fu : टेंशन होणार खल्लास मनोरंजन होणार झकास; 'फु बाई फू' प्रेक्षकांच्या भेटीला
Fu Baai Fu : 'फु बाई फू' हा लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Fu Baai Fu : गेल्या काही दिवसांत वेगवेगळा आशय असलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'फू बाई फू' (Fu Baai Fu) हा लोकप्रिय कार्यक्रम गेल्या काही दिवासांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाचे तब्बल 14 भाग प्रदर्शित झाले आहेत. आता नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा 'फू बाई फू' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'फू बाई फू' कार्यक्रमात कॉमेडीचे कार्यक्रम गाजवलेले हरहुन्नरी कलाकार दिसणार आहेत. तसेच काही नवे कलाकार देखील या कार्यक्रमात असणार आहेत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मराठीतील आघाडीची अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार असून परिक्षणाची जबाबदारी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत आणि उमेश कामत करणार आहेत.
सध्या 'फू बाई फू' या कार्यक्रमात कोणते कलाकार हास्याची धमाल उडवून देणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक प्रोमो आऊट झाला असून सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल होत आहे. 'फू बाई फू' या कार्यक्रमाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहते आनंदी झाले आहेत.
View this post on Instagram
'फू बाई फू' 3 नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला
'तुम्ही हसणार पोट धरून... कारण इथे कॉमेडी होणार भरभरून', 'जिथे असाल तिथे हसाल!', 'टेंशन होणार खल्लास मनोरंजन होणार झकास' असं म्हणत 'फू बाई फू' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा कार्यक्रम 3 नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
फू बाई फू
कुठे पाहू शकता? झी मराठी
किती वाजता? गुरु-शुक्र (शनिवारी) रात्री 9.30 वा.
संबंधित बातम्या