Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'राजकारणात प्रवेश करणार का?' ; मुनमुननं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष
Munmun Dutta : राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न एका व्यक्तीनं मुनमुनला विचारला

Munmun Dutta : प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)या मालिकेतील मुनमुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत मुनमुन 'बबिता जी' ही भूमिका साकारते. काही दिवसांपूर्वी मुनमुननं अनुसूचित जातीबद्दल टिप्पणी केली. तेव्हापासून ती चर्चेत आहे. नुकताच एका व्यक्तीनं मुनमुन दत्ताला राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नावला मुनमुननं उत्तर दिलं आहे.
एका व्यक्तीनं सोशल मीडियावर मुनमुनला विचारलं, 'तुम्ही बंगालमधील एका पक्षामध्ये प्रवेश करून निवडणूक का नाही लढत?' मुनमुननं याव र उत्तर दिलं, 'अजिबात नाही. मला भ्रष्ट व्हायचं नाहिये' मुनमुन विविध विषयांवरील तिची मतं सोशल मीडियावर मांडत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी चर्चेत असतात.
View this post on Instagram
मुनमुन दत्ताचे नाव तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील टप्पू ही भूमिका साकारणारा राज अनादकटसोबत जोडले गेले. त्या दोघांच्या नात्याबद्दल सोशळ मीडियावर चर्चा झाली. असं म्हणलं जात होत की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. पण ही केवळ अफवा आहे. मुनमुनने देखील सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली होती.
हेही वाचा :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























