एक्स्प्लोर

Kiran Mane: "शून्यातून विश्व निर्माण करणारी कष्टाळू माणसं पाहिली की..."; किरण माने यांची खास पोस्ट

Kiran Mane: नुकतीच किरण माने यांनी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Kiran Mane:  अभिनेते   किरण माने (Kiran Mane) हे काही दिवसांपासून किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे  चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच किरण माने यांनी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी साताऱ्यातील शेंगदाणा विक्रेते सतीशरावांचे कौतुक केले आहेत. 

"राजवाड्यावरनं तुला सतीश शेंगदानावाल्याकडचे शेंगदाने आनून दिन." आसं म्हणलं की, लहानपणी मी कितीबी रडून धिंगाणा घातला असला तरी गप बसायचो. दादांना माझं हे गुपित नीट म्हायती होतं. कारण अख्ख्या सातार्‍यागत त्यांनाबी या शेंगदान्यांची भुरळ पडली होती! जगात भारी चव. त्यावेळी मी चारपाच वर्षांचा असेन, आज त्रेपन्न वर्षांचा हाय. आजबी आमची तिसरी पिढी, माझा पोरगा आरूष, राजवाड्यावर गेल्यावर सतीशरावांचे शेंगदाने खाल्ल्याशिवाय परत येत नाय. हे माझंच नाय, समस्त सातारकरांच्या पिढ्या-पिढ्यांचं 'व्यसन' हाय!"

"मी 'बिग बॉस'मध्ये एकदोनवेळा म्हन्लो होतो की, यार, राजवाड्यावरचे शेंगदाने मी मिस करतोय." ते बघून सतीशरावांचं मन इतकं भरून आलं की त्यांनी जाहीर केलं "आमचा सातारचा बच्चन किरण माने आन् त्याच्या परीवारासाठी सतीश शेंगदानेवाल्याकडचे शेंगदाने फ्री मिळणार! काल लै दिवसांच्या गॅपनंतर सतीशरावांना भेटलो. "ऐSSSS किरSन आरं य्ये भावा." करत मिठीच मारली त्यांनी. मला म्हणले एक जानेवारीला "माझ्या व्यवसायाला पन्नास वर्ष पूर्ण होनारंयत. या व्यवसायानं मला सगळं ऐश्वर्य दिलं. पैसा, बंगला, गाडी भरभराट झाली. सहा शाखा जोरात सुरू हायेत आजबी. त्याची परतफेड म्हनून येत्या एक जानेवारीला सकाळी दहा ते रात्री दहा सगळ्या सातारकरांना माझ्याकडचे स्पेशल एक नंबर शेंगदाने, महाबळेश्वरी फुटाने, डाळ, गुळ शेंगदाणा चिक्की, कडक वाटाणा, सोयाबीन, सुर्यफूलाची बी... काय पायजे ते, आन् कितीबी मी फ्री देनार ! त्या सुवर्णमहोत्सवी दिवसाचं उद्घाटन आमचा किरण माने करनार. तू पायजेच मला. शुटिंग बिटींगची कारनं मला सांगायची नाहीत." मला भरून आलं."

"शून्यातून विश्व निर्माण करणारी  कष्टाळू माणसं पाहिली की त्या माणसात माझा आज्जा नाना दिसतो ! माझा आज्जा शेतमजूर होता, नंतर मुंबईत मिलमध्ये हमालीबी केली. आमचे सतीश रावखंडे शेंगदानेवालेबी वखारीत हमाल होते. हातावर पोट. एक दिवस ती वखार जळली. हातचं काम गेलं. संसार कसा चालवायचा? हमाली करताना दहा पैसे, चार आने, आठ आने असे पैसे साठवून बावीस रूपये जमा झालेवते. त्यात शेंगदान्याचा व्यवसाय सुरू करूया असं डोक्यात आलं. मिठाचं प्रमाण आणि भाजन्याची पद्धत हीच युनिक आन् सिक्रेट रेसीपी. बघता-बघता व्यवसाय नांवारूपाला आला. आज एवढं वय आनि पैशापान्यानं भक्कम होऊनबी सतीशराव आजबी राजवाड्यावरच्या स्टॉललवर उभे राहुन सेवा देत असत्यात. सतीशराव तुमच्या कष्टाळू आणि दिलदार वृत्तीला कडकडीत सलाम ! लब्यू"

View this post on Instagram
 
A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

इतर महत्वाच्या बातम्या:

Kiran Mane: "कुणी कितीही भडकवायचा प्रयत्न करू दे, आपण तोल जाऊ द्यायचा नाही"; किरण मानेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US India Tariffs : भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल
भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल
Delhi Accident: BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, महिलेला अटक, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा
BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, महिलेला अटक, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा
CIBIL Score : कर्ज काढण्यासाठी आणि  क्रेडिट कार्डसाठी सिबील स्कोअर महत्त्वाचा, कर्ज मिळण्यासाठी किती स्कोअर गरजेचा? जाणून घ्या
CIBIL स्कोअर किती असला की कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळतं, सिबील स्कोअर मोफत कसा तपासायचा?जाणून घ्या
धनंजय मुंडे म्हणाले बंजारा-वंजारी एकच, हरिभाऊ राठोडांनी सांगितला इतिहास, बंजारा तरुणांचाही कडाडून विरोध
धनंजय मुंडे म्हणाले बंजारा-वंजारी एकच, हरिभाऊ राठोडांनी सांगितला इतिहास, बंजारा तरुणांचाही कडाडून विरोध
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US India Tariffs : भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल
भारतासाठी गुड न्यूज, अमेरिकेसोबत लवकरच मोठा व्यापारी करार; ट्रम्प यांची खास टीम दिल्लीत दाखल
Delhi Accident: BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, महिलेला अटक, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा
BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, महिलेला अटक, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा
CIBIL Score : कर्ज काढण्यासाठी आणि  क्रेडिट कार्डसाठी सिबील स्कोअर महत्त्वाचा, कर्ज मिळण्यासाठी किती स्कोअर गरजेचा? जाणून घ्या
CIBIL स्कोअर किती असला की कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळतं, सिबील स्कोअर मोफत कसा तपासायचा?जाणून घ्या
धनंजय मुंडे म्हणाले बंजारा-वंजारी एकच, हरिभाऊ राठोडांनी सांगितला इतिहास, बंजारा तरुणांचाही कडाडून विरोध
धनंजय मुंडे म्हणाले बंजारा-वंजारी एकच, हरिभाऊ राठोडांनी सांगितला इतिहास, बंजारा तरुणांचाही कडाडून विरोध
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो-3 ॲक्वा लाईनबाबत महत्वाची अपडेट, कुठे असणार स्टेशन्स?
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो-3 ॲक्वा लाईनबाबत महत्वाची अपडेट, कुठे असणार स्टेशन्स?
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळलं, पाकिस्तान संतापला; मॅच रेफरीची ICC कडे तक्रार, पीसीबीने दिला इशारा
टीम इंडियाने हस्तांदोलन टाळलं, पाकिस्तान संतापला; मॅच रेफरीची ICC कडे तक्रार, पीसीबीने दिला इशारा
ITR Filing : शेवटच्या दिवशी Income Tax वेबसाईटच्या गटांगळ्या, करदात्यांचं टेन्शन वाढलं
शेवटच्या दिवशी Income Tax वेबसाईटच्या गटांगळ्या, करदात्यांचं टेन्शन वाढलं
Nashik Crime Uddhav Nimse : हत्याप्रकरणात 20 दिवस पोलिसांना गुंगारा, कोर्टाने फटकारताच भाजपच्या माजी नगरसेवकाची शरणागती, अखेर बेड्या
हत्याप्रकरणात 20 दिवस पोलिसांना गुंगारा, कोर्टाने फटकारताच भाजपच्या माजी नगरसेवकाची शरणागती, अखेर बेड्या
Embed widget