प्रतिक्षा संपली; Friends : The Reunion चा ट्रेलर प्रदर्शित
Friends: The Reunion चा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने आता लवकरच प्रेक्षकांना या शोचा पुन्हा एकदा आनंद घेता येणार आहे. 1994 साली सुरु झालेल्या या शोचा प्रेक्षकवर्ग आजही कायम असून तो वेगवेगळ्या पिढ्यांतील आहे.
Friends: The Reunion चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या शोमध्ये जेनिफर अॅनिस्टन, कर्टेनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेविड श्विमर यांनी मुख्य भूमिका केली आहे. या व्यत्तिरिक्त या कार्यक्रमात सर्व कलाकार, संगितकार आणि या कार्यक्रमाशी संबंधित प्रत्येकाला सामिल करुन घेण्यात आलं आहे.
Picture this:
— HBO Max (@hbomax) May 19, 2021
The year is 2002, it’s Thursday night, and you rush home to catch the latest episode of Friends. Now get ready for it to happen all over again. Friends: The Reunion is streaming May 27 on HBO Max. #FriendsReunion pic.twitter.com/1ZrHq4HxSM
डेव्हिड बॅकहॅम, जस्टिन बिबर, जेम्स कार्डन, सिंडी क्रॉफर्ड, कारा डेलेविंगने, लेडी गागा, इलियट गोल्ड, किट हॅरिंग्टन लॅरी हॅकिंग हे सेलिब्रेटी आणि एका एपिसोडमध्ये मलाला युसुफजई देखील दिसणार आहे.
या आधी या शोचा टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीजरमध्ये जेनिफर अॅनिस्टन, कर्टेनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेविड श्विमर हे कलाकार दिसले होते. या शोचा प्रिमिअर 27 मे ला आयोजित करण्यात आला आहे. खासकरून जेनिफर अॅनिस्टनच्या अदा पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा आतुर झालेला आहे. फ्रेन्ड्स हे माझे कुटुंब असल्याची भावना जेनिफर अॅनिस्टनने व्यक्त केली आहे.
फ्रेन्ड्स ही मालिका सर्वात आधी 1994 साला सुरु करण्यात आली होती. 2004 सालापर्यंत ती एनबीसीवर दाखवण्यात येत होती. या मालिकेची निर्मिती डेविड क्रेन, मार्टा कॉफमन यांनी केली होती. फ्रेन्ड्सला 2002 सालचा प्राईम टाईम बेस्ट कॉमेडी मालिकेचा अॅमी अॅवार्ड मिळाला होता.
महत्वाच्या बातम्या :