एक्स्प्लोर

Corona Update : कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, गेल्या 24 तासात 2.76 लाख नव्या रुग्णांची भर तर 3,874 जणांचा मृत्यू

Coronavirus Cases in India : जगातील रोजच्या वाढणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांपैकी 40 टक्के रुग्ण हे भारतातील आहेत तर जगातला प्रत्येक तिसरा मृत्यू भारतात होतोय.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाची दुसरी लाट काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. आज सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 2,76,110 रुग्णांची भर पडली असून एकाच दिवसात 3874 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 3,69,077 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ही 96,841 ने कमी झाली आहे. त्या आधी मंगळवारी कोरोनाचे 2.67  लाख नवीन रुग्ण सापडले होते. 

बुधवार 19 मेपर्यंत, देशात 18 कोटी 70 लाख 9 हजार 792 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत. बुधवारी एकाच दिवसात देशात 11 लाख 66 हजार 90 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या. आतापर्यंत देशात 32 कोटीहून जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी देशात 20 लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

देशातील आजची कोरोना स्थिती : 

  • एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 57 लाख 72 हजार 440
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 23 लाख 55 हजार 440
  • एकूण सक्रिय रुग्ण : 31 लाख 29 हजार 878
  • कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 87 हजार 112

देशातील कोरोनाचा मृत्यू दर हा 1.11 टक्के इतका आहे तर रिकव्हरी दर हा 86 टक्के आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून 13 टक्के झाली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागत असून अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तर मृतांच्या संख्येत भारताचा अमेरिका, ब्राझिलनंतर तिसरा क्रमांक लागतो. 

महाराष्ट्रातली स्थिती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर  34,031 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 4978937 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.  यामुळं  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  91 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज 594 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54 टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  31874364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5467537 (17.15 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 3059095 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 23828 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज एकूण 401695 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party Abhijeet Dipke: मोठी बातमी: कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी, अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवताच मोठं यश
कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी, अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवताच मोठं यश
Rohit Pawar on Rajesh Mehta Scam: मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? 15 लाख कोटींचा घोटाळा अन् रोहित पवारांच्या 'त्या' ट्विटने खळबळ
मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? 15 लाख कोटींचा घोटाळा अन् रोहित पवारांच्या 'त्या' ट्विटने खळबळ
India Natural Gas Discovery: मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा; इंधन टंचाईच्या सावटावर भारताला जॅकपॉट 
मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा; इंधन टंचाईच्या सावटावर भारताला जॅकपॉट 
20 जूनपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणार, गडकरींचं आश्वासन, काँग्रेसच्या माजी खासदारानं घेतली भेट
20 जूनपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणार, गडकरींचं आश्वासन, काँग्रेसच्या माजी खासदारानं घेतली भेट

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
Cockroach Janta Party: अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, 'कॉकरोच पार्टी'चं पहिलं टार्गेट ठरलं, धर्मेंद्र प्रधानांचा आंदोलनातील 'तो' फोटो व्हायरल
अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, 'कॉकरोच पार्टी'चं पहिलं टार्गेट ठरलं, धर्मेंद्र प्रधानांचा आंदोलनातील 'तो' फोटो व्हायरल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Embed widget