एक्स्प्लोर
'क्राईम पेट्रोल'फेम अभिनेत्याची मेव्हणीच्या घरी आत्महत्या
नवी दिल्ली : सोनी वाहिनीवरील सुप्रसिद्ध शो 'क्राईम पेट्रोल'मध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता कमलेश पांडेने आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. छातीवर गोळी झाडून कमलेशने आपलं आयुष्य संपवल्याची माहिती आहे.
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये ही घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. आत्महत्या घडली त्यावेळी कमलेशसोबत त्याची मेव्हणीही उपस्थित होती. काहीच दिवसांपूर्वी कमलेशची मेव्हणी अंजनी चतुर्वेदी यांच्या मुलीचं लग्न झालं. मात्र लग्नाला आमंत्रित न केल्याने कमलेश नाराज होता.
घटनेच्या दिवशी कमलेशने मद्यपान करुन धिंगाणा घातला. नशेतच त्याने पिस्तुल काढून हवेत गोळी झाडली. त्यानंतर स्वतःच्या छातीवरही एक गोळी झाडली. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिस आणि रुग्णवाहिकेला बोलावलं. मात्र तोपर्यंत कमलेशचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी आत्महत्येची नोंद केलेली असली, तरी पोस्टमार्टम अहवालानंतर सर्व काही स्पष्ट होणार आहे. कमलेशच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement