Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडले 'नॉमिनेशन रॉकेट' टास्क; हे स्पर्धक झाले नॉमिनेट
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या नॉमिनेशन रॉकेट या कार्यामुळे दोन्ही ग्रुपमध्ये आणि सदस्यांमध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.
Bigg Boss Marathi 4: 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) घरामध्ये काल पार पडले “नॉमिनेशन रॉकेट” हे नॉमिनेशन कार्य. नॉमिनेशन कार्याअंती या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये किरण, अमृता देशमुख, त्रिशूल, विकास, योगेश, आणि प्रसाद हे सदस्य नॉमिनेट झाले. आता या आठवड्यात कोणत्या सदस्याला घराबाहेर पडावे लागेल, कोणाचा प्रवास संपणार हे या रविवारी कळेलच. नॉमिनेशनमध्ये आल्याने विकास जरा नाराज आहे आणि त्याच संदर्भात आज अपूर्वा त्याच्याशी संवाद साधताना दिसणार आहे.
अपूर्वा विकासची समजूत काढणार असून त्याला सांगणार आहे, मला तुझा राग कळतो आहे सगळ्यांनी मिळून तुला नॉमिनेट केले आहे. तुला कुठेतरी तो inferiority कॉम्प्लेक्स आहे असं मला जाणवतं आहे. तुला असं वाटतं आहे फक्त दाद्या तुला समजून घेतो. काय होतं ना तू जरी शंभर टक्के बरोबर असला तरी पण दिसताना असं दिसत आहे कि त्यांच्या मेंदूने तू गेम खेळतो आहेस. जेव्हा कि असं नाहीये आणि म्हणून तुझी चिडचिड होते आहे. कारण तुझी निर्णयक्षमता मी बघितली आहे म्हणून आज मी तुला नॉमिनेट नाही केलं. कारण जिथे दादा नाहीये तिथे मी तुला तुझे निर्णय घेताना आणि खेळ खेळताना पहिले आहे. आत बघूया यांच्यात अजून काय चर्चा होते ते. अपूर्वाचं म्हणणं विकासला कळतं का?
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या नॉमिनेशन रॉकेट या कार्यामुळे दोन्ही ग्रुपमध्ये आणि सदस्यांमध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. अपूर्वा आणि विकासच्या चर्चेनंतर आता तेजस्विनी देखील अमृता देशमुख, प्रसाद आणि योगेशसोबत चर्चा करताना दिसणार आहे. अमृता देशमुखचे म्हणणे आहे तिला दुसऱ्या ग्रुपसोबत खेळून बघायचे आहे. ज्यावर तिला तिच्या ग्रुपमधील सदस्यांनी समजावून सांगितले... पण ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. तेजस्विनी सांगणार आहे, प्रसाद तुला सारखं जर तिला त्या ग्रुपमध्ये नको जाऊ असं करायचं असेल तर तू करत जा, कारण तिने देखील बघितले आहे तो ग्रुपदेखील equally तयार होता तिला नॉमिनेट करायला. तो वेगळा भाग झाला... पण मला प्रसादला personally सांगायचे आहे, मी अमृताच्या individuality चा खूप आदर करते, त्यामुळे आता मी तिला नाही थांबवणार. कारण मला देखील वाटतं कोणी खुश नसेल तर… पण तू ग्रुप फुटेल म्हणून तिला नको थांबवूस. आता आपल्या ग्रुपमधले जवळजवळ सगळेच नॉमिनेट झाले आहेत. आपण कोणाला अडवून कोणाची growth नको थांबवायला.