Shiv Thakare: शिव ठाकरे म्हणतो, 'माझ्या 169 गर्लफ्रेंड होत्या...'; बिग बॉसमधील वक्तव्याची चर्चा
एका एपिसोडमध्ये शिव ठाकरेनं (Shiv Thakare) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं.

Shiv Thakare: छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान (Salman Khan) करतो. वीकेंड का वारमध्ये सलमान स्पर्धकांसोबत चर्चा करतो. या सीझनमध्ये प्रेक्षकांना स्पर्धकांची भांडणं, टास्क आणि ड्रामा हे सर्व बघायला मिळत आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये स्पर्धक शिव ठाकरेनं (Shiv Thakare) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं. शिवनं सांगितलं की, त्याला 169 गर्लफ्रेंड होत्या, त्याच्या या वक्तव्यानं अनेकांचं लक्ष वेधलं.
काय म्हणाला शिव ठाकरे?
'माझं आयुष्य एका ओपन बुक सारखं आहे. मी कोणत्या गोष्टी लपवत नाही. माझ्या 169 गर्लफ्रेंड होत्या. मी सगळं सांगितलं आहे. कोणाला सरप्राइज दिलं, पहिल्या गर्लफ्रेंडसोबत झालेलं बोलणं मी सगळं बिग बॉसला सांगितलं आहे. तुम्ही मला काहीपण विचारा. मी सगळं सांगू शकतो.' असं शिव ठाकरेनं बिग बॉसच्या घरात सांगितलं.
View this post on Instagram
शिव आणि विणाच्या नात्याची चर्चा
बिग बॉसच्या मराठीच्या दुसऱ्या सीझनचा शिव हा विजेता आहे. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमुळे शिवला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यावेळी शिव ठाकरे आणि विणा जगताप हे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. बिग बॉसमधील त्या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. पण शिव आणि विणा यांनी ब्रेकअप केला आहे, असंही म्हटलं जात आहे.
शिव यानं एमटीव्ही रोडीज या कार्यक्रमामध्ये देखील सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामध्ये देखील त्यानं विविध टास्क खेळले होते.
बिग बॉस-16 मधील स्पर्धक
शिव ठाकरेसोबतच अब्दू, निमृत कौर, गौतम, शालीन, सुंबुल, टीना, सौंदर्या, एससी स्टेन, साजिद खान या स्पर्धकांनी बिग बॉस-16 मध्ये सहभाग घेतला आहे. हे स्पर्धक बिग बॉसच्या घरामध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करतात. तसेच विविध टास्क देखील खेळतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:























