एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अभिनेता अनिकेत विश्वासराव विवाहबंधनात

फारसा गाजावाजा न करता पुण्यातील गुलमोहर विलेजमध्ये अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणचा विवाहसोहळा पार पडला.

मुंबई : बॉलिवूडमध्ये दीपिका-रणवीर, प्रियंका चोप्रा-निक जोनास अशा सेलिब्रेटींच्या विवाहाचा सीझन सुरु आहे. मराठी मनोरंजनविश्वातही लग्नसराई सुरु झाली आहे. 'चॉकलेट हिरो' अशी ओळख असलेला अभिनेता अनिकेत विश्वासराव लग्नाच्या बेडीत अडकला. अभिनेत्री स्नेहा चव्हाणसोबत पुण्यात अनिकेत विवाहबद्ध झाला. फारसा गाजावाजा न करता गुलमोहर विलेजमध्ये अनिकेत-स्नेहाचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि मनोरंजन विश्वातील काही कलाकार उपस्थित होते. विशेष म्हणजे हे अरेंज मॅरेज आहे. स्नेहा-अनिकेतचा साखरपुडा पुण्यातील हिंजवडीमध्ये यावर्षी पाच ऑगस्टला झाला होता. अनिकेत आणि स्नेहाचं लग्न जून महिन्यातच ठरलं होतं. स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. या ओळखीतून दोघं भेटले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. स्नेहा मूळ पुण्याची आहे, तर अनिकेतचं बालपण मुंबईतील बोरीवलीमध्ये गेलं. 37 वर्षीय अनिकेत विश्वासरावने 'अल्फा मराठी' वाहिनीवरील 'नायक' मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'झी मराठी'वरील 'ऊनपाऊस' मालिकेत त्याने साकारलेली सागरची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली होती. तेव्हापासूनच अनिकेत अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला. कळत नकळत, एकापेक्षा एक, महाराष्ट्राचा सुपरस्टार, सुपर वुमन यासारख्या कार्यक्रमातही तो झळकला. याशिवाय लव्ह बर्ड, सुर्याची पिल्ले, नकळत सारे घडले या नाटकातही त्याच्या भूमिका गाजल्या. बघतोस काय मुजरा कर, पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल, नो एन्ट्री पुढे धोका आहे, फक्त लढ म्हणा यासारख्या चित्रपटात अनिकेत दिसला. स्नेहा चव्हाणने सोनी मराठीवरील महाराष्ट्राचा फेवरिट डान्सर या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. याशिवाय ती हृदयात वाजे समथिंग या मालिकेतही भूमिका करते. स्नेहाने यापूर्वी स्वप्नील जोशीच्या 'लाल इश्क' या चित्रपटात भूमिका केली होती. अनिकेत आणि स्नेहा चव्हाण 'हृदयात वाजे समथिंग समथिंग' या चित्रपटात एकत्र झळकले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget