Apurva Gore : 'आई कुठे काय करते' मधील 'ही' अभिनेत्री लवकरच दिसणार हिंदी मालिकेत, पोस्ट शेअर करत दिली माहिती
'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाची भूमिका साकारणारी अपूर्वा गोरे तिच्या एका नव्या प्रवासाला लवकरच सुरूवात करणार आहे. अपूर्वा आता हिंदी मालिकेत दिसणार आहे.
![Apurva Gore : 'आई कुठे काय करते' मधील 'ही' अभिनेत्री लवकरच दिसणार हिंदी मालिकेत, पोस्ट शेअर करत दिली माहिती Aai Kuthe Ky Karate Actress Apurva Gore Working With Star Plus Baatein Kuch Ankahi Si Detail Marathi Serial News Apurva Gore : 'आई कुठे काय करते' मधील 'ही' अभिनेत्री लवकरच दिसणार हिंदी मालिकेत, पोस्ट शेअर करत दिली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/21/0eb998d5aea926697c857c068a4c15141692604526926766_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Apurva Gore Post : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेची क्रेझ जवळपास सर्व महिलांमध्ये पाहायला मिळते. यातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ही मालिका अनेक महिलांच्या रोजच्या आयुष्याशी संबंधित असणारी असल्याने या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले आहे. मालिकेत रोज नवनवीन ट्विस्ट येत असतात. ज्यामुळे प्रेक्षकांना मालिका पाहायला मजा येते.
मात्र आता मालिकेत ईशाची भूमिका साकारणारी अपूर्वा गोरे तिच्या एका नव्या प्रवासाला लवकरच सुरूवात करणार आहे. अपूर्वा आता हिंदी मालिकेत दिसणार आहे. स्टार प्लस वरील 'बातें कुछ अनकही सी' या मालिकेत अपूर्व दिसणार असून तिची या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. तिने त्या पोस्टमध्ये मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतील ईशाला तिचे चाहते हिंदी मालिकेत पाहण्याकरता मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत.
View this post on Instagram
अपूर्वाने ही पोस्ट शेअर करत लिहिले आहे, "नवी सुरुवात, नवीन साहस, नवा अध्याय, चला सुरूवात करूया. कुणाल आणि वंदना यांच्यातील जादुई प्रेमाचे साक्षीदार होऊया. "बातें कुछ अनखही सी" दररोज (सोम-रवि) रात्री 9.00 वाजता फक्त स्टार प्लसवर." तिच्या या पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सध्या मालिकेत ईशा आणि अनीषच्या लग्नाची मोठी धावपळ होताना दाखवत आहेत. तसेच सोबत काही नवनवीन ट्विस्ट देखील त्यात दाखवत आहेत. अपूर्वा सोशल मिडीयानर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटोशूट देखील नेहमी हटके असते. तसेच ती खूप सुंदर नाच करते त्यामुळे ती डान्सचे व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोबतच गाणे गातानाचे व्हिडीओसुद्धा ती पोस्ट करत असते.
'आई कुठे काय करते' मालिकेची स्टार कास्ट
'आई कुठे काय करते' या मालिकेत मधुराणी प्रभूलकर या अरुंधती ही भूमिका साकारतात. आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी हे साकारतात. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
संबंधित बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)