(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aai Kuthe Kay Karte:'खरंतर मी एक ऑड मॅन आऊट होतो...'; ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील मिलिंद गवळी यांनी शेअर केली खास पोस्ट
अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Aai Kuthe Kay Karte: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेनं 1000 एपिसोड्सचा टप्पा पूर्ण केला आहे. यानिमित्तानं या मालिकेत अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आई कुठे काय करते या मालिकेनं 1000 एपिसोड्सचा टप्पा पूर्ण केल्यानंतर या मालिकेच्या टीमनं सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ मिलिंद यांनी सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "श्रद्धा आणि सबुरी आई कुठे काय करते या मालिकेचे 1000 एपिसोड पूर्ण झाले आहेत 7.12.2019 या मालिकेचे शूटिंग सुरू केलं, त्यावेळेला माझ्या मनामध्ये असंख्य प्रश्न होते, पण वाटत नक्की होतं की ही सीरिअल खूपच लोकांना भावेल, खूप आवडेल ही सीरिअल, त्याचं मुख्य कारण म्हणजे या सीरिअलच्या नावामध्ये "आई" या शब्दाचा उल्लेख आहे, आणि दुसरं कारण होतं राजन जी शाही,आपल्या क्रिकेटच्या टीम मध्ये सचिन तेंडुलकर आहे म्हटल्यानंतर आपली टीम भारीच खेळणार आणि जिंकणार,असा एक वेगळा कॉन्फिडन्स खेळाडूंना असेल ना , तसाच आमच्या या “आई कुठे काय करते” च्या टीम मध्ये राजनशाही आहेत, राजन शाही एक मराठी सीरिअल करतायेत म्हटल्यावर ती उत्कृष्टच होणार, याची एक वेगळीच खात्री सगळ्या ना होती, डायरेक्टर्स कट प्रोडक्शन चे सर्वेसर्वा राजन जी , हे आम्हाला प्रोड्युसर लाभले होते, नमिता वर्तक म्हणजेच कमलाकर नाडकर्णी यांची कन्या, जिने खरंतर मला या सीरिअल साठी माझी “अनिरुद्ध देशमुख” या पात्रासाठी निवड केली, उत्कृष्ट इतर सगळे कलाकार, उत्कृष्ट दिग्दर्शनाची टीम, उत्कृष्ट सेटिंग, उत्कृष्ट लेखन, सगळंच या सिरीयल मधलं भारी होतं, स्टार प्रवाह चॅनल ने सुद्धा सीरिअलचे प्रमुख उत्कृष्ट केले होते, पहिल्या दिवसापासूनच लोकांच्या मनामध्ये ही सीरिअल बसली.'
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं. 'खरंतर मी एक odd man out होतो, मी जे कॅरेक्टर करत होतो अनिरुद्ध देशमुख नावाचं, ते सुद्धा odd man out आहे, पहिल्यांदा ज्यावेळेला नमिताने माझी राजन शाही यांच्याशी ओळख करून दिली, त्यावेळेला माझ्याविषयी त्यांच्या डोळ्यांमध्ये मला फार काही confidence दिसला नाही, तसं ते मला काही बोलले नाहीत तरी, पहिल्या भेटीत मला ते जाणवलं होतं, पण त्यांचा नमितावर खूप कॉन्फिडन्स होता आणि तिच्यावर खूप विश्वास होता, आणि म्हणून खरंतर माझं कास्टिंग या इतक्या भारी रोल साठी झालं, "श्रीमोई" नावाची बंगाली मालिके चं हे सुरुवातीला रूपांतरण होतं, त्यामध्ये जो अनिरुद्ध देशमुख होता, तो अगदी भारदस्त व्यक्तीमहत्त्व होतं, त्याचे काही episodes मला राजनजींनी पाहायला सांगितले होते, ते भाग पाहिल्यानंतर मी जरा घाबरलोच होतो, अमरीश पुरी सारखी त्याची पर्सनॅलिटी होती, team ने मला सांभाळून घेतलं,एक हजार एपिसोड नंतर सुद्धा मला सांभाळून घेत आहेत, त्यांनी एक वेगळाच अनिरुद्ध देशमुख माझ्याकडून करून घेतला, या आई कुठे काय करते च्या टीमने. DKP राजन जी, स्टार प्रवाह पासून आमच्या अगदी स्पोर्ट बॉय पर्यंत सगळ्यांचा मी ऋणी आहे सगळ्यांचा मी आभारी आहे !आज सेटवर छान हवन पूजा झाली, 1000 एपिसोड चा केक आज आम्ही कापला.'
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: