Vanita Kharat : "मी जितकं हसवते आहे तितकचं..."; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातची पोस्ट चर्चेत
Vanita Kharat : 'महाराष्ट्रीची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम वनिता खरातची लक्षवेधी पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
Vanita Kharat Post : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार घराघरांत पोहोचले आहे. विनोदवीर, अभिनेत्री वनिता खरातला (Vanita Kharat) या कार्यक्रमाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवून दिली आहे. आता अभिनेत्रीची लक्षवेधी पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
वनिताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने अमेरिका, कॅनडा आणि भारतामध्ये तिचा वाढदिवस कसा साजरा केला याची झलक दाखवली आहे. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या व्हिडीओवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स करत अभिनेत्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वनिता खरातची पोस्ट काय आहे? (Vanita Kharat Post)
वनिताने लिहिलं आहे,"या वर्षीचा माझा वाढदिवस खूप विशेष होता. कारण दीड दिवस माझा वाढदिवस साजरा झाला तोही तीन देशांमध्ये अमेरिका , कॅनडा आणि भारत... तोही माझ्या लाडक्या माणसांबरोबर. इतक्या जल्लोषात आणि उत्साहात , इतक्या वेगवेगळ्या गोष्टी बघत माझा वाढदिवस साजरा होईल असं खरंच वाटलं नव्हतं. प्रेक्षकांच्या प्रेमाची ताकद मला आज इथवर घेऊन आली, आणि माझ्या मित्रांनी या वाटेवर माझी सोबत केली".
View this post on Instagram
वनिताने पुढे लिहिलं आहे,"घरच्यांच्या शुभाशीर्वादाने मला मार्ग दाखवला आणि नाजूक क्षणात सुमितने माझा हात धरला. इतके प्रचंड देश पाहताना, तिथलं सौंदर्याने भारावून जाताना आणि प्रत्येक केक कापताना, सुमितची मात्र प्रचंड आठवण आली. मी तिथे असताना भारतात वाढदिवस साजरा करण्याची धुरा सुमितने सांभाळली आणि शुभेच्छा ही माझ्या पर्यंत पोहोचवल्या. या वाढदिवसानिमित्त स्वतःसाठी काही गोष्टी ठरवल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मिळणारं प्रेम द्विगुणित करण्याचा प्रयत्न करेन. जितकं हसवते आहे तितकाच मीही हसत राहण्याचा प्रयत्न करेन, सोबत तुम्ही असालच ही आशा बाळगून. पुढच्या वाढ दिवसाला बघुया कुठल्या देशात असेन".
वनिता खरातबद्दल जाणून घ्या...
वनिता खरात ही लोकप्रिय अभिनेत्री आणि विनोदवीर आहे. न्यूड फोटोशूट, 'कबीर सिंह' सिनेमातील मोलकरीण आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे वनिताला लोकप्रियता मिळाली आहे. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीदेखील तिने गाजवलं आहे. आता तिला टॉलिवूडमध्येही काम करण्याची इच्छा आहे. वनिताचा 19 जुलैला वाढदिवस होता. तीन देशांमध्ये तिने तिचा वाढदिवस साजरा केला आहे.
संबंधित बातम्या