एक्स्प्लोर

यंदाचा रविवारी प्रेक्षकांसाठी ठरणार खास, प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांचे रंगणार एक तासाचे विशेष भाग

'मन झालं बाजिंद', 'मन उडू उडू झालं' आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकांमध्ये रंजक वळण येणार आहे.

Marathi Serial : ओटीटी  माध्यमाने स्वत:चा एक वेगळा प्रेक्षकवर्ग बनवला असला तरी मराठी मालिका पाहणारा एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. संध्याकाळी 7 पासून ते 10-10:30 दरम्यान घराघरांत उत्साहाने मालिका पाहिल्या जातात. या मालिकेत आता रंजक वळणे येणार आहेत. तर प्रेक्षकांसाठी यंदाचा रविवार खास ठरणार आहे. प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांचे एक तासाचे विशेष भाग रंगणार आहेत. 

'मन झालं बाजिंद', 'मन उडू उडू झालं' आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकांमध्ये रंजक वळण येणार आहे. 'मन झालं बाजिंद' मालिकेच्या राया आणि कृष्णाच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर बेशुद्ध कृष्णाला राया स्वतः श्वास देऊन वाचवतो. यावरून राया आणि कृष्णाचं भांडण होतं. रायाला त्याचं आणि कृष्णाचं नवरा बायकोयच नातं मान्य नसल्यामुळे कृष्णा माहेरी जाण्याचा निर्णय घेते. जो पर्यंत राया तिला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही तो पर्यंत ती विधात्यांच्या घरी परतणार नसल्याचं ती ठरवते. रंतु हळदीच्या मालाची डिलीव्हरी करण्यासाठी कृष्णाच्या सहीचा प्रश्न येतो तेव्हा राया स्वतः ट्रक घेऊन कृष्णाच्या दारात येतो. तेव्हा रायाला कृष्णाचं घर जप्त केलं जाणार हे कळतं आणि जबरदस्ती घर खाली करायला लावणाऱ्या वसुलीवाल्या माणसाला राया बेदम मार देतो. राया त्याला पुन्हा कृष्णाच्या घराकडे नजर वर करूनसुद्धा बघायचं नाही म्हणतो. राया आणि कृष्णालामधला दुरावा दूर होईल का? राया कृष्णाला पत्नी म्हणून स्वीकारून घरी घेऊन जाईल का? हे प्रेक्षकांना येत्या रविवारी पाहता येणार आहे. 

'मन उडू उडू झालं' मालिकेतील दिपूच्या प्रत्येक संकटात इंद्रा तिच्यामागे सावलीसारखा उभा असतो. याचं कारण म्हणजे इंद्राचे दिपूवर असलेले प्रेम. पण हे प्रेम इंद्राला व्यक्त करता येत नाही. दिपू एका अपघातात आगीच्या कचाट्यात सापडते हे पाहून इंद्रा तिच्या मदतीला धावतो पण दिपू त्याला आगीत शिरण्यापासून थांबवते. आपल्या चारी बाजूला आग लागलेली असताना दिपूला चक्कर येते आणि तिला वाचवण्यासाठी इंद्रा पुढे सरसावतो. तो तिला सुखरूप बाहेर काढतो. दरम्यान तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुलीदेखील देतो. दिपूला इंद्राच्या भावना कळल्यानंतर दिपू काय प्रतिक्रिया देणार हे प्रेक्षकांना रविवारी पाहायला मिळणार आहे. 

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या मालिकेतील देशमुख कुटुंबीय आदिती आणि सिडच्या साखरपुड्याची तारीख ठरवण्यासाठी मुंबईला रवाना होतात. अदिती मिटींगमध्ये अडकल्यामुळे सिडचे फोन उचलू शकत नाही. दिती घराच्या गेटवर पोहोचलेल्या सिड आणि त्याच्या कुटुंबाचे तिथल्या वॅाचमनशी भांडण होतं. देशमुख अडचणीतही आनंद शोधून दाखवतात आणि बराचवेळ इतकी लोकं गेटवर थांबल्यामुळे महालक्ष्मीला बिल्डींगमधून तक्रारीचे फोन येऊ लागतात. शेवटी अदितीही गेटजवळ पोहोचते. महालक्ष्मीला नाईलाजाने देशमुखांना घरात घ्यावं लागतं. ती लगेच साखरपुड्याची तारीख जाहीर करण्यासाठी संध्याकाळी पार्टी ठेवली असल्याचं सांगते. अदिती पार्टीसाठी देशमुखांना छान तयार करते. पार्टीमध्ये आलेल्या महालक्ष्मीच्या मैत्रीणी देशमुख बायकांची खिल्ली उडवतात. त्या परिस्थिती बिघडू नये म्हणून शांत रहातात. 21 नोव्हेंबर साखरपुड्याची तारीख ठरते. महालक्ष्मी हा साखरपुडा मोडण्यासाठी श्रीमंत मुलाला अदितीचं स्थळ सुचवते. इथे अदिती आणि सिड उत्साहात देशमुखांच्या मदतीने अंगठ्या खरेदी करतात. सिड आणि अदितीचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडेल की महालक्ष्मी या साखरपुड्या दरम्यान घोळ घालेल हे प्रेक्षकांना रविवारी पाहता येणार आहे. 

संबंधित बातम्या

Kangana Ranaut On Farm Laws : कंगना रनौत पुन्हा बरळली, मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्याने कंगना भडकली

Jhimma-Pandu movie : 'झिम्मा' आज होणार प्रदर्शित; 'पांडू' चित्रपटाच्या टीमने दिल्या शुभेच्छा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget