Kangana Ranaut On Farm Laws : कंगना रनौत पुन्हा बरळली, मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्याने कंगना भडकली
Kangana Ranaut On Farm Laws : कंगनाचे अधिकृत ट्विटर अकाउंच हटवण्यात आले आहे. त्यामुळे कंगना तिची मतं इंस्टाग्रामच्या माध्यमातून व्यक्त करते.
Kangana Ranaut On Farm Laws : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut) वेगवेगळ्या विषयांवर तिची मतं मांडत असते. कंगनाने केलेले वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन कृषी कायदे मागे घेतले. मोदींच्या या घोषणेनंतर कंगना रनौतने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कृषी कायद्याच्या निर्णयावर भडकलेली कंगना भारताला 'जिहादी देश' असे म्हणाली आहे.
कंगना रनौत काय म्हणाली ?
कंगनाचे ट्विटर अकाउंट हटवण्यात आले असले तरीही ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिची मतं व्यक्त करताना दिसते. कंगनाने इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे,"संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर ते जिहादी देश आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन".
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात तीन कृषी कायदे आणले. या मागील उद्देश शेतकऱ्यांना ताकत देण्याचा आहे. कित्येक वर्षांपासून ही अनेकांची मागणी होती. आधीही काही सरकारांनी यावर मंथन केलं होतं. यावेळीही चर्चा करुन हे कायदे आणले. देशातील अनेक शेतकऱ्यांनी याचं स्वागत केलं. मी आज त्या सर्वांना खूप आभारी आहे. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी पूर्ण ताकतीनं, समर्पण भावनेनं हे कायदे आणला आहे. इतक्या प्रयत्नानंतरही काही शेतकऱ्यांना आम्ही ही गोष्ट समजावू शकलो नाही. आम्ही या कायद्यांचं महत्व सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विनम्रतेनं आम्ही त्यांच्या गोष्टी देखील समजून घेतल्या. यात आम्ही काही बदल देखील केले. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचाही प्रयत्न केला. मी देशवासियांची क्षमा मागतो. आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. काही शेतकऱ्यांना आम्ही या गोष्टी समजावू शकलो नाही. आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहोत, असं मोदींनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
मोठी बातमी...! तिन्ही कृषी कायदे मागे... पंतप्रधान मोदींची घोषणा
Farm Laws Repeal: कृषी कायदे रद्द करणं दुर्दैवी, हा काळा दिवस, कायद्याच्या समर्थकांच्या तीव्र प्रतिक्रिया
Farm Laws : सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha