एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'इश्क में मरजावा' मालिकेतील अभिनेता कुशल पंजाबीची गळफास घेऊन आत्महत्या
अभिनेता कुशल पंजाबीने राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या. त्याच्या पश्च्यात त्याचे आई-वडिल, पत्नी, चार वर्षांचा मुलगा आणि एक बहिण असा परिवार आहे.
मुंबई : प्रसिद्ध टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता कुशाल पंजाबी याने गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो 37 वर्षांचा होता. कुशल पंजाबीचे निधन झाल्याची बातमी समजताच, त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कुशलने विविध मालिका आणि सिनेमात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्याची प्रसिद्ध मालिका 'इश्क में मरजावां' प्रचंड गाजली.
अभिनेता करणवीर बोहराने एबीपी माझाशी बोलताना कुशाल पंजाबीच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. कुशलच्या पश्च्यात त्याचे आई-वडिल, पत्नी, चार वर्षांचा मुलगा आणि एक बहिण असा परिवार आहे.
कुशल पंजाबीने फरहान अख्तरचा चित्रपट लक्ष्य, करण जोहरचा चित्रपट काल, निखिला अडवाणीच्या सलाम-ए-इश्क आणि विवेक अग्निहोत्रीच्या दे दना दन, गोल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक रिअॅलिटी शोज, वेब शोज, कुसुम, इश्क में मरजावां यांसारख्या अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. पाहा व्हिडीओ : 'इश्क में मरजावा' मालिकेतील अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या करणवीर बोहराने एबीपीशी बोलताना सांगितले की, 'कुशल एक उत्तम अभिनेता होता. तसेच तो एक माणूस म्हणूनही चांगला होता. मला ही बातमी समजताच धक्का बसला. मला नाही माहिती त्याने एवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागे का कारण आहे.' दरम्यान, काल रात्री कुशलने घरात गळफास घेत आत्महत्या केली. कुशलच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आज दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कुशल हा 37 वर्षाचा होता. त्याने युरोपियन मुलीसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती. त्यांना एक मुलगा देखील आहे. 2016 ला त्याच्या मुलाचा जन्म झाला होता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement