एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'मुंबईची भाषा हिंदी' म्हणणाऱ्या 'तारक मेहता'चा माफीनामा
या मालिकेत प्रसारित करण्यात आलेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार अशी शपथ घेतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापूजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. हे मनोमिलन घडवून आणताना या मालिकेतील वृद्ध बापूजी अर्थात जेठालालचे वडील जयंतीलाल गाडा यांच्या तोंडी मुंबईची भाषा ही हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे.
मुंबई : 'मुंबईची भाषा हिंदी' आहे असं म्हटल्यामुळं सब टिव्हीवरची मालिका तारक मेहता का उलटा चष्मा चांगलीच वादात सापडली आहे. अखेर या मालिकेच्या निर्मात्याने आणि बापूजीची भूमिका साकारणाऱ्या अमित भट यांनी माफी मागितल्याने या वादावर पडदा पडला आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात या मालिकेतील जेठालालचे वडील बापूजी यांच्या तोंडी मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आला आहे. याबाबत मनसेने आवाज उठवल्यानंतर आता मालिकेच्या निर्मात्यांनी व्हिडीओ प्रसारित करत माफी मागितली आहे.
या मालिकेत 'तारक मेहता'ची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांच्याकरवी व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने सर्वांना सामावून घेतलं आहे. या अर्थाने मुंबईची भाषा हिंदी हे वाक्य वापरण्यात आलं होतं. आम्ही प्रत्येक प्रांताचा-धर्माचा आणि भाषेचा सन्मान करतो. पण मालिकेत प्रसारित झालेल्या संवादामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर यासाठी आम्ही माफी मागतो, या शब्दांत निर्मात्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
त्याआधी या मालिकेत बापूजीची भूमिता साकारणारे कलाकार अमित भट यांनीही याप्रकरणात माफी मागितली. अमित भट यांनी मनसेच्या नावाने मराठीमध्ये पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली. मला स्क्रिप्टमध्ये लिहून देण्यात आलेला संवाद मी कॅमेऱ्यासमोर बोललो. मुंबईची भाषा ही हिंदी नसून मराठी आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. झालेल्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दांत अमित भट यांनी माफी मागितली.
— Asit Kumarr Modi (@AsitKumarrModi) March 3, 2020
'तारक मेहता का उलटा चष्मा' वादात, 'मुंबईची भाषा हिंदी' असल्याच्या संवादामुळे मनसे आक्रमक
मनसेने घेतला होता आक्षेप मालिकेत नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात या मालिकेतील जेठालालचे वडील बापूजी यांच्या तोंडी मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर अक्षेप घेतला असून सब टिव्हीने याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली होती. या मालिकेत प्रसारित करण्यात आलेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार असा पण करतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापूजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. यादरम्यान बापूजींच्या तोंडी मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. यावर आक्षेप घेत मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला होता. मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही, याचीच शरम वाटत असल्याचं खोपकरांनी म्हटलं होतं. जेम्स बॉन्डचा मराठमोळा अंदाज, बॉन्डच्या चित्रपटाचा ट्रेलर मराठीत काय आहे नेमका संवाद जेठालालचे वडील जयंतीलाल गाडा म्हणजेच बापूजी हे सर्वांचं मनोमिलन करत असताना हा वादग्रस्त संवाद म्हणतात. 'देखो हमारा गोकुलधाम मुंबई में है. और मुंबई की आम भाषा हिंदी है, इसलिए हम सुविचार हिंदी में लिखते है. अगर हमारा गोकुलधाम चेन्नई में होता तो हम सुविचार तामिल में लिखते' असा तो संवाद आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement