एक्स्प्लोर
Advertisement
जेम्स बॉन्डचा मराठमोळा अंदाज, बॉन्डच्या चित्रपटाचा ट्रेलर मराठीत
या ट्रेलरमध्ये जेम्स बॉन्ड आणि इतर कॅरेक्टर्स हे मराठी भाषा बोलताना दिसत आहेत. मराठी भाषेत त्यांचे संवाद डब करण्यात आले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 10 भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. जेम्स बॉन्ड या लोकप्रिय सिरीजमधील ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.
मुंबई : 'प्रत्येकाचं एक रहस्य असतं, पण तुझं अजून समजलेलं नाहीये', 'जगात शस्त्र थैमान घालताहेत', 'माझ्यापासून लांब राहा, आडवा आलास तर चालू शकणार नाहीस' हे मराठमोळे संवाद आपल्याला जेम्स बॉन्डच्या अंदाजात ऐकायला मिळाले तर... मिळाले तर म्हणजे काय? हे संवाद चक्क बॉन्डच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. जगप्रसिद्ध जेम्स बॉन्ड सिरीजचा आता 25 वा भाग भेटीला येत आहे. 'नो टाइम टू डाय' असं या सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाचा ट्रेलर मराठीसह तब्बल 10 भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 2 एप्रिल 2020 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार असून सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे.
10 भाषांमध्ये या सिनेमाचा ट्रेलर आल्यानं हा सिनेमा विविध भाषांमध्ये पाहणं रंजक ठरणार आहे. मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी, भोजपुरी, बंगाली, मल्याळम या भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 2 एप्रिल रोजी हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
मराठी भाषेतील या सिनेमाचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे. या ट्रेलरमध्ये जेम्स बॉन्ड आणि इतर कॅरेक्टर्स हे मराठी भाषा बोलताना दिसत आहेत. मराठी भाषेत त्यांचे संवाद डब करण्यात आले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 10 भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. जेम्स बॉन्ड या लोकप्रिय सिरीजमधील ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. सोशल माध्यमावर या ट्रेलरची चांगलीच चर्चा सुरु असून काहींनी मराठी भाषेत आलेल्या या ट्रेलरचे कौतुक केलं आहे तर काहींनी टीका देखील केली आहे. या चित्रपटात डेनियल क्रेग जेम्स बॉन्ड 007 च्या रुपात परत येणार आहे. चित्रपट 51 वर्षांच्या डेनियल क्रेग हे सर्वात जास्त काळ बॉन्डची भूमिका साकारली आहे. डेनियल सर्वात अगोदर 2006 मध्ये आलेल्या 'कसिनो रॉयाल'मध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारत आहे. पाहा ट्रेलर-#NoTimeToDie trailer drops tomorrow in *10* languages: #Hindi, #Tamil, #Telugu, #Kannada, #Gujarati, #Marathi, #Punjabi, #Bhojpuri, #Bengali, #Malayalam... 2 April 2020 release in *5* languages: #English, #Hindi, #Tamil, #Telugu, #Kannada. #JamesBond007 #Bond25 #BondJamesBond pic.twitter.com/MWB3vwdHye
— taran adarsh (@taran_adarsh) February 27, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement