एक्स्प्लोर

'तारक मेहता का उलटा चष्मा' वादात, 'मुंबईची भाषा हिंदी' असल्याच्या संवादामुळे मनसे आक्रमक

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची भाषा ही मराठी होती, आहे आणि राहणार. फक्त ती वापरणाऱ्यांनी रोजच्या व्यवहारात आग्रहाने वापरण्याची गरज आहे. बाहेरुन आलेल्या माणसाला तोडकंमोडकं मराठी बोलण्याचा आग्रह धरणे गरजेचे आहे. तर आणि तरच दुसऱ्या भाषांचं अतिक्रमण मुंबईवर होणार नाही.

मुंबई : सब टिव्हीवरची मालिका तारक मेहता का उलटा चष्मा पुन्हा एकदा वादात सापडलेली आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात या मालिकेतील जेठालालचे वडील बापूजी यांच्या तोंडी मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर अक्षेप घेतला असून सब टिव्हीने याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे. या मालिकेत प्रसारित करण्यात आलेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार असा पण करतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापूजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. यादरम्यान बापूजींच्या तोंडी मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. गुजराती किड्यांची वळवळ थांबवावी - मनसे यावर आक्षेप घेत मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही, याचीच शरम वाटत असल्याचं खोपकरांनी म्हटलं आहे. नेमकं काय घडलं या मालिकेत प्रसारित करण्यात आलेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार अशी शपथ घेतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापूजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. हे मनोमिलन घडवून आणताना या मालिकेतील वृद्ध बापूजी अर्थात जेठालालचे वडील जयंतीलाल गाडा यांच्या तोंडी, मुंबईची भाषा ही हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. काय आहे नेमका संवाद  जेठालालचे वडील जयंतीलाल गाडा म्हणजेच बापूजी हे सर्वांचं मनोमिलन करत असताना हा वादग्रस्त संवाद म्हणतात. 'देखो हमारा गोकुलधाम मुंबई में है. और मुंबई की आम भाषा हिंदी है, इसलिए हम सुविचार हिंदी में लिखते है. अगर हमारा गोकुलधाम चेन्नई में होता तो हम सुविचार तामिल में लिखते' असा तो संवाद आहे. निर्माते काय म्हणाले हा वाद उफाळल्यानंतर मालिकेचे निर्माता असितकुमार मोदी यांनी सीरियलच्या शेवटी प्रसारित झालेला एक सीन ट्विट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे आणि आपल्या महाराष्ट्राची राजभाषा मराठीच आहे. यात काही संदेह नाही. मी भारतीय आहे. महाराष्ट्रीय आहे आणि गुजराती देखील आहे. मी सर्व भारतीय भाषांचा सन्मान करतो, असं मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar on  Dharamrao Baba Atram : आत्रम यांच्या मुलीचा पराभव होईल - विजय वडेट्टीवारShaikh Subhan Ali :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Embed widget