वीर पहाडियासोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्ये तारा सुतारियाची पहिली पोस्ट, नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या
या कॉन्सर्टला तारा आणि वीर दोघेही उपस्थित होते आणि व्हिडिओमध्ये वीरची प्रतिक्रिया देखील चर्चेत आली. त्यानंतरच दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा जोर धरू लागल्या.

Tara Sutaria Veer Paharia: बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांच्या नात्याबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांमध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा असतानाच, ताराने अखेर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हे सगळं एपी ढिल्लोंच्या मुंबईतील कॉन्सर्टनंतर सुरू झालं. या कार्यक्रमात तारा थेट स्टेजवर एपी ढिल्लोंसोबत दिसली होती. त्या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तारा एपी ढिल्लोंला मिठी मारताना आणि गालावर किस करताना दिसत होती. विशेष म्हणजे, या कॉन्सर्टला तारा आणि वीर दोघेही उपस्थित होते आणि व्हिडिओमध्ये वीरची प्रतिक्रिया देखील चर्चेत आली. त्यानंतरच दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा जोर धरू लागल्या.
अफवांदरम्यान ताराची पहिली पोस्ट
या सर्व चर्चांनंतर तारा सुतारियाने सोशल मीडियावर पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे. मात्र, या पोस्टमध्ये तिने वैयक्तिक आयुष्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ताराने आपल्या आगामी चित्रपट ‘टॉक्सिक’ संदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये चित्रपटाच्या टीझरने अवघ्या 24 तासांत सर्व प्लॅटफॉर्मवर 20 कोटी व्ह्यूज पार केल्याची माहिती देण्यात आली आहे. पोस्टरमध्ये अभिनेता यश लाल रंगाच्या पार्श्वभूमीवर बंदूक हातात घेतलेला दिसतो.

वीरची शांतता चर्चेत
ब्रेकअपच्या अफवा सुरू असतानाच चाहत्यांनी आणखी एक गोष्ट लक्षात घेतली आहे. वीर पहाडियाने ‘टॉक्सिक’च्या टीझरवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा तो आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. यामुळे चर्चांना आणखी हवा मिळत आहे. तारा आणि वीर दोघांनीही अद्याप या कथित ब्रेकअपवर अधिकृतपणे काहीही स्पष्ट बोलले नाहीयत.
ब्रेकअपच्या चर्चेमुळे चाहत्यांना धक्का
गेल्या काही दिवसांपासून तारा आणि वीर वेगळे झाल्याचं सांगितलं जात आहे. काही महिन्यांपूर्वीच तारा आणि वीर यांनी सोशल मीडियावरून आपल्या नात्याची कबुली दिली होती, त्यामुळे ही बातमी चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. मात्र, ब्रेकअपचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.सध्या तरी तारा आणि वीर दोघांचीही शांतता कायम असून, त्यांच्या नात्याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.























