एक्स्प्लोर

कसं होतं सुशांत-रियाचं नातं? सुशांतच्या मृत्यूआधी नेमकं काय घडलं?- नोकर नीरजचं संपूर्ण स्टेटमेंट

सुशांत मृत्यूप्रकरणात सुशांतचा नोकर नीरजची चौकशी करण्यात आली. तसेच त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आहे. यात नीरजने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नीरज सिंग एप्रिल 2019 मध्ये सुशांत सिंह राजपूतकडे हाउस कीपिंगमध्ये कामाला लागला होता.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. काल सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणात सुशांतचा नोकर आणि बराच काळ सुशांतसोबत असलेला नोकर नीरजची चौकशी करण्यात आली. तसेच त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलं आहे. यात नीरजने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नीरज सिंग एप्रिल 2019 मध्ये सुशांत सिंह राजपूतकडे हाउस कीपिंगमध्ये कामाला लागला होता. नीरजने सांगितले की, कॅप्री हाइट्समध्ये राहत असताना सर जेव्हा वर्कआऊट करायला बाहेर जायचे. तेव्हा मी त्यांची रूम साफ करायचो आणि जेव्हा मुंबईबाहेर जायचे तेव्हा त्यांच्या बेडरूमची चावी घेऊन जायचे. मात्र जेव्हा माउंट ब्लॅक मध्ये ते शिफ्ट झाले तेव्हा सुशांत सर रूममध्ये कपडे बदलत असतील किंवा जर रूममध्ये रिया मॅम असतील तेव्हाच रूम आतून लॉक असायची. परंतु ती रूम बाहेरून लॉक करून सर कधीच गेले नाहीत, असं नीरजनं सांगितलं. कॅप्री हाईटमध्ये घडायच्या अशा घटना नीरजनं सांगितलं, आम्ही कॅप्री हाईटमध्ये राहत असताना सरांनी आम्हाला वॉकीटॉकी दिली होती आणि सरांना जे काही हवा असेल ते आम्हाला वॉकीटॉकीवर मागायचे. एके रात्री आम्ही झोपलो असताना नीरज लाईट बंद करो असा वॉकीटॉकीवर मेसेज आला. मात्र मी सरांच्या रूममध्ये गेलो तेव्हा सर झोपले होते आणि लाईट बंद होती. मी पुन्हा खाली आलो. पुन्हा थोड्या वेळाने वॉकीटॉकीवर तोच मेसेज आला. मी पुन्हा वर जाऊन पाहिलं तेव्हा सर झोपले होते आणि लाईट बंद होती. मी घाबरलो आणि त्या रात्री मी झोपू शकलो नाही. आम्ही तिथे असताना लाईट बंद होणे, लिफ्ट वर खाली होणे, आपोआप ड्रम वाजणे अशा घटना ऐकून होतो. त्यामुळे सुशांत सर केप्रीहाईट्समध्ये कमी आणि वॉटर स्टोन क्लब येथे जास्त राहत होते. युरोप टूरवरुन आल्यावर आजारी होता सुशांत नीरजनं सांगितलं, सुशांत सर ऑक्टोबर 2019 मध्ये रिया मॅम सोबत युरोपमध्ये फिरण्यास गेले होते. ते जेव्हा परत आले, तेव्हा ते आपल्या घरी न राहता रिया मॅम सोबत राहत होते. सरांनी तिथेच दिवाळी साजरा केली आणि दहा ते पंधरा दिवसांसाठी केप्रीहाइट्स मध्ये आले होते मात्र त्यावेळेस ते अशक्त दिसत होते. सर नवीन घर शोधत होते त्याच वेळेला मी आणि अजून दोघे जण सरांच्या पवना येथे फार्म हाऊस मध्ये राहत होतो आणि सर रिया मॅम सोबत राहत होते. त्याचदरम्यान सर ऍडमिट असल्याचं मला मिरांडा सरांनी सांगितलं. डिसेंबर 2019 मध्ये सरांनी माउंट ब्लॅंक मध्ये एक घर भाड्याने घेतलं. त्या घराची साफसफाई करण्यासाठी मला बोलावण्यात आलं. मी आल्यानंतर जेव्हा सरांना भेटलो, तेव्हा सर खूपच आजारी आणि थकल्यासारखे वाटत होते. मी जेव्हा सरांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत बरी नाही आणि त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यानंतर आम्ही सर्वजण माऊंट ब्लॅंकमध्ये राहण्यास गेलो. दुपारी बारा वाजता सर ताज लँड्स मध्ये जिम साठी जात असत, असं नीरजनं सांगितलं. असा होता  माउंट ब्लॅंकमध्ये दिनक्रम नीरजनं सांगितलं, लॉकडाऊनमध्ये रिया मॅम सुशांत सरांसोबत राहण्यासाठी आल्या. त्या सतत सरांसोबत असत. मध्ये फक्त एक किंवा दोन दिवसासाठी त्यांच्या आई-वडिलांकडे जात होत्या किंवा त्यांचे आई-वडील एक किंवा दोन दिवसासाठी माउंट ब्लॅंक मध्ये येत होते. दोघे सकाळी ब्लॅक कॉफी घेत आणि गप्पा मारत असे. सकाळी टेरेसवर रिया मॅम आणि सुशांत सर हे व्यायाम करत होते. कधीकधी दुपारी जेवणानंतर सुशांत सर मला टेरेसवर म्युझिक आणि योगाचा सामान लावण्यास सांगत असायचे आणि रात्रीच्या जेवणासाठी केशवला सांगितले जात असे. असा त्यांचा दिनक्रम सुरू होता. रियाने 8 तारखेला घर सोडलं नीरजनं सांगितलं, आठ जून तारखेस मी आणि केशव जेवणाची तयारी करत होतो आणि आम्ही रिया मॅम आणि सुशांत सरांना बोलवायला जाणार होतो. तेवढ्यात मला रिया मॅमने बोलावलं आणि त्यांच्या कपाटातील कपडे बॅगमध्ये भरण्यास सांगितलं. त्या वेळेस रिया मॅम थोड्या रागात होत्या. तसेच दुसऱ्या कपाटातील कपडे नंतर येऊन घेऊन जातील, असे सांगितले. त्यावेळी रिया मॅम जेवण न करता त्यांचा भाऊ सोनिक बरोबर निघून गेल्या. सुशांत सर हे रूम मध्ये बसून होते. रिया मॅम गेल्यानंतर सुशांत सरांची बहिणी मितू सिंग आल्या. आणि 12 जूनला मितू दीदी निघून गेल्या. जाण्यापूर्वी मी दोन ते तीन दिवसात येईल, तोपर्यंत सुशांतची काळजी घेण्यास मला सांगून गेल्या. मितू दीदी असताना दीदी आणि सर एकत्र जेवत होते. दीदी गेल्यानंतर सुशांत सर संध्याकाळी टेरेसवर बसले आणि मला रूम साफ करण्यास सांगितले. 14 जूनला हे घडलं नीरजनं सांगितलं, 13 जूनला सुशांत सर सकाळी 7 वाजता उठले. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे कुत्र्यांना फिरवून घेऊन 9 वाजता आलो. तेव्हा सुशांत सर आपल्या रूममध्ये बसले होते. मी त्यांना रूम साफ करण्यास विचारलं तर त्यांनी नंतर कर म्हणून सांगितलं. मी सरांना दुपारी खाण्यासाठी खिचडी देऊन आलो. त्यानंतर संध्याकाळी सर टेरेसवर फिरण्यासाठी बाहेर आले आणि परत आल्यानंतर त्या रात्री सर जेवले नाही त्यांनी फक्त मॅंगो ज्यूस घेतला आणि झोपी गेले. 14 जून रोजी मी नेहमीप्रमाणे उठलो आणि सवयीप्रमाणे कुत्र्यांना फिरवण्यात घेऊन आल्यानंतर 8 वाजता मी वरची रूम साफ केली. त्यानंतर जिना साफ करत असताना सुशांत सर रूममधून बाहेर आले व मला थंड पाणी पिण्यासाठी मागितलं. सरांना पाणी दिल्यानंतर सर उभे राहून पाणी प्यायले आणि मला हॉल साफ है क्या असा विचारले आणि हसून रुम मध्ये गेले. सरांनी दरवाजा उघडला नाही नीरजनं सांगितलं, सकाळी साडेनऊ वाजता मी हॉलमध्ये झाडू मारत असताना केशव केळी, ज्यूस आणि नारळ पाणी सरांसाठी घेऊन जाताना मी पाहिलं. मात्र केशव जेव्हा बाहेर आला तेव्हा सरांनी फक्त ज्यूस आणि नारळ पाणी घेतल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता जेवण काय करायचं हे विचारण्यासाठी केशव सरांच्या रूमकडे गेला आणि जेव्हा नॉक केली तेव्हा रूम आतून लॉक असल्याचं कळलं. सर झोपले असतील असे समजून केशव खाली आला आणि त्याने ही बाब खाली बसलेल्या सिद्धार्थ आणि दिपेशला सांगितली. तेव्हा दीपेश आणि सिद्धार्थ सरांची रूम नॉक करू लागले. बराच वेळ नॉक केल्यानंतरही सरांनी दरवाजा उघडला नाही, तेव्हा दीपेश खाली आला आणि त्यांनी मला सांगितले. सिद्धार्थ सरांनी लॉक तोडण्यास सांगितलं नीरजनं सांगितलं, मग मीही सरांच्या रूम जवळ गेलो सर रूम उघडत नसल्याने सिद्धार्थने सरांच्या फोनवर फोन केला. आम्ही रुमची चावी शोधू लागलो पण आम्हाला चावी मिळाली नाही म्हणून सिद्धार्थने मितू दिदींना फोन करून सर अर्ध्या तासापासून दरवाजा उघडत नसल्याचं सांगितलं. सिद्धार्थ यांनी चावी बनवणाऱ्यांना फोन केला. दुपारी दीडच्या सुमारास 2 चावी बनवणारे आले. चावी बनवण्यास वेळ लागत होता, म्हणून सिद्धार्थ सरांनी त्यांना लॉक तोडण्यास सांगितलं. पाच ते दहा मिनिटात लॉक तोडण्यात आला. त्यानंतर चावी बनवणार यांना दोघांना खाली पाठवण्यात आले आणि दीपेशने त्यांना दोन हजार रुपये दिले. त्यानंतर ते दोघे तिथून निघून गेले. त्यानंतर दीपेश हा वर आल्यानंतर सिद्धार्थने रूम उघडली तेव्हा पूर्ण रूममध्ये काळोख होता आणि AC चालू होता. तेव्हा दीपेशने रूमची लाईट चालू केली व सिद्धार्थ हा पुढे गेला व अचानक बाहेर आला, असं नीरजनं सांगितलं. नीरजनं सांगितलं, मग दीपेश व मी काय झाले हे पाहण्यासाठी जेव्हा आत गेलो तेव्हा सुशांत सर खिडकीकडे तोंड करून पंख्याला हिरव्या रंगाच्या कुर्त्याने गळफास घेऊन बेडच्या बाजूला लटकलेल्या स्थितीत होते. मी घाबरून रूमच्या बाहेर आलो. सिद्धार्थने मितू दिदींना फोन केला आणि माहिती दिली. त्यानंतर सिद्धार्थने मला कुर्ता कापण्यासाठी चाकू देण्यास सांगितले मी चाकू घेऊन आलो आणि सिद्धार्थला दिला. तेव्हा सिद्धार्थ यांनी सरांनी गळफास लावलेला कुर्ता चाकूने कापला. त्यामुळे सुशांत सरचे पाय बेडच्या खाली आणि कमरेवरील शरीर बेडवर अशा स्थितीत धापकन पडले. त्यानंतर मितू दिदी या रूम मध्ये आल्या आणि ओरडू लागल्या,नीरजनं सांगितलं. त्यानंतर मितू दीदी याने सरांना बेडवर नीट झोपवण्यास सांगितले. म्हणून आम्ही सरांना बेडवर नीट झोपवले. त्यावेळी त्यांचे डोके पायाच्या बाजूस आणि डोके पायाच्या बाजुस अशा उताण्या स्थितीत सुशांत सरांना ठेवले. त्याच वेळी सुशांत सरांच्या गळ्याभोवती असलेले कुर्त्याची गाठ मी सोडली आणि ते बाजूस फेकून दिली. त्यानंतर सिद्धार्थ याने सुशांतच्या छातीवर दाब देऊन त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला मात्र याचा काहीच फरक पडला नाही. मग सिद्धार्थने मदतीसाठी पोलिसांना फोन केला त्यानंतर तिथे पोलिस आले. सुशांत सरांनी गळफास लावण्यासाठी वापरलेला कुर्ता हा सुशांत सरांचा होता. सदर कुर्ता हा फॅब इंडिया कंपनीचा होता. अशा प्रकारचे तीन ते चार कुर्ते सरांकडे आहेत.  सदरचे कुर्ते सर पूजेच्या दिवशी वापरत असत. तरी पाच ते सहा महिन्यांपासून सरांची तब्येत ठीक नसल्याने सरांनी आत्महत्या केली असावी असे मला वाटते, असं नीरजनं सांगितलं, नीरजनं सांगितलं, एप्रिल 2019 मध्ये सुशांत सिंह राजपूतकडे हाउस कीपिंगमध्ये कामाला लागला होता. मात्र 2 दिवसांनी माझी तब्येत बिघडल्यामुळे मी काम सोडलं. मे 2019 मध्ये सुशांतच्या मॅनेजरने मला फोन करून पुन्हा कामावर बोलावून घेतलं. मी जेव्हा कामास लागलो तेव्हा रजत, सिद्धार्थ, आयुष, मिरांडा, आनंदी, सॅम्युअल, केशव हे सर्वजण कामात होते. मी जेव्हा कामाला लागलो तेव्हा सुशांत सर कॅप्री हाइट्स मध्ये राहायचे, त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये माउंट बँकमध्ये शिफ्ट झाले, असं ते म्हणाले. संबंधित बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget