एक्स्प्लोर

CBI Investigation in SSR Death Case: आपलेच दात आणि आपलेच ओठ; संजय राऊतांचा राज्यातल्या भाजप नेत्यांवर निशाणा

Supreme Court Verdict on SSR Death Case: मुंबई पोलिसांना आपल्याच राज्याचे राजकारणी बदनाम करत असतील तर ते या राज्याचे खच्चीकरण करतायत असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आपल्याच राज्याचे लोक आपल्या पोलिसांची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर हे महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा घणाघात देखील राऊतांनी केला. आज सुप्रीम कोर्टात निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. पण शिवसेना नेते संजय राऊत यांनी अतिशय सावध भूमिका मांडली आहे. या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या युवा नेत्यांचं नाव वारंवार घेतलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका काय असणार? याकडे सर्व पक्षाचं लक्ष लागलं होतं. सीबीआयकडे तपास जाणं हा मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी मोठा धक्का आहे. आमच्या पोलिसांचं खच्चीकरण करण्याचं काम सुरु असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी देत महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची पाठराखण केली आहे.

संजय राऊत काय म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही. ही कायदेशीर आणि न्यायालयीन बाब आहे. यावर महाधिवक्ता आणि मुंबई पोलीस आयुक्त बोलू शकतील असं राऊत म्हणाले. महाराष्ट्र राज्य हे न्याय व सत्यासाठी संघर्ष करणारे राज्य आहे. कुणावरही अन्याय करणारे राज्य नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, हे एक षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांना आपल्याच राज्याचे राजकारणी बदनाम करत असतील तर ते या राज्याचे खच्चीकरण करतायत असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला. मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणं म्हणजे ज्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्यांनी घटना निर्माण केली, त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं देखील संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

शिवसेनेचा या प्रकरणाशी काय संबंध?

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या एका युवा नेत्यांचा समावेश असल्याचा सोशल मीडियावर विरोधकांकडून आरोप करण्यात आला. भाजपकडून वारंवार शिवसेनेच्या नेत्यांचा संबंध असल्याची वक्तव्य करण्यात आली. याच युवा नेत्याला पाठीशी घालण्यासाठी मुंबई पोलीस काम करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळेच हा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी विरोधकांनी केल्यानंतर या प्रकरणाकडे आणखी संशयाने पाहण्यात आलं.

संबंधित बातम्या

CBI Probe in SSR Case | सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करणार

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget