South Movie Singer: "वर्जिन मुली मिळणं मुश्किल..."; प्रसिद्ध गायिकेनं कंडोम विक्रीच्या पोस्टवर साधला निशाणा, युजरला झाड झाड झाडलं
Chinmayi Sripada Bash Twitter User On His Post: गायिका चिन्मयी श्रीपादानं एका ट्विटर यूजरला फटकारलं आहे. त्या युजरनं सोशल मीडियावर लिहिलं होतं की, या पिढीत व्हर्जिन मुली मिळणं कठीण झालं आहे. नववर्षाच्या रात्री लाखो कंडोमची विक्री झाल्याचे त्यांनं नमूद केलं होतं. युजरची पोस्ट चिन्मयीनं शेअर केली आहे आणि त्याला जोरदार फटकारलं आहे.
Chinmayi Sripada Bash Twitter User On His Post: गायिका चिन्मयी श्रीपाद (Chinmayi Sripaada) तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. गुरुवारी, तिनं एका सोशल मीडिया (Social Media) युजरला जोरदार फटकारलं, कारण त्या युजरनं लाखो कंडोम विकल्यानंतर, या पिढीत कुमारी मुली मिळणं कठीण असल्याचं म्हणत दुःख व्यक्त केलं होतं. गायिकेनं त्या युजरला चोख प्रत्युत्तर दिलं. ती म्हणाली की, असं असेल तर, तू तुझ्या आजुबाजूच्या पुरुषांना लग्नापूर्वी सेक्स करू नको, असं सांग. केवळ महिलांना लागू होणाऱ्या नियमातील दुटप्पी दर्जाही तिनं यावेळी युजरच्या निदर्शनास आणून दिला.
नव्या वर्षाच्या दिवशी, 1 जानेवारी, 2025 रोजी @venom1s नावाच्या युजरनं लिहिलं की, "ब्लिंकिटच्या सीईओनं आताच पोस्ट केलं आहे की, 31 डिसेंबरच्या रात्री 1.2 लाख पार्सल डिलिव्हर केले गेले. फक्त आणि फक्त ब्लिंकिटवरुन. इतर ई-कॉमर्स साईट्स आणि मार्केटची विक्री 10 मिलियनपर्यंत झाली होती. या जनरेशनमध्ये लग्नासाठी वर्जिन मुलगी शोधण्यासाठी शुभेच्छा...!"
चिन्मई श्रीपदाचं युजरला सडेतोड उत्तर
गायिका चिन्मयी श्रीपदानं आता डिलीट करण्यात आलेल्या ट्वीटचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आणि लिहिलं की, "पुरुषांनी लग्नापूर्वी महिलांसोबत सेक्स करु नये. जोपर्यंत ते पुरूष बकऱ्या, कुत्रे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसोबत सेक्स करत नसतील."
गायिकेनं आणखी एका युजरला फटकारलं
आणखी एका सोशल मीडिया युजरनं चिन्मयीला तिच्या वक्तव्यासाठी जोकर म्हणून संबोधलं. तसेच, तो युजर पुढे म्हणाला की, महिलांनी असं करू नये. यावर बोलताना चिन्मयी म्हणाली की, "स्त्रिया वर्जिन नसतात. स्त्रिया असे गृहीत धरतात की पुरुष आधीच लैंगिकदृष्ट्या सक्रिय आहेत आणि तुम्ही सर्वांनी सुरक्षित किंवा असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले आहेत की नाही हे विचारण्याची त्यांची हिम्मतही होत नाही." पुढे बोलताना ती म्हणाली की, "असं असलं तरी, असं वाटतं की, इंसेल ब्रदर्सना वाटतं की, एकदा त्यांनी एखाद्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर त्यांनी तिला कायमचं भ्रष्ट केलं आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :