Aishwarya Rai Doppelganger: तेच डोळे... अगदी तसेच ओठ; हुबेहुब Aishwarya Rai दिसते 'ही' बॉलिवूडची अभिनेत्री, तुम्हाला काय वाटतं?
Aishwarya Rai Doppelganger: नेटकरी म्हणतात, हुबेहुब ऐश्वर्या राय सारखी दिसते, बॉलिवूडची ही अभिनेत्री. इंटरनेटवर रंगल्यात तिच्याच चर्चा. तुम्हालाही असंच वाटतं का?
Aishwarya Rai Doppelganger: गेल्या काही आठवड्यांपासून वामिका गब्बीची (Wamiqa Gabbi) ऐश्वर्या रायशी (Aishwarya Rai) तुलना करतानाचे व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेत आहेत. निक्का झैलदार 2 (Nikka Zaildar 2) मधील अभिनेत्रीचे डोळे ऐश्वर्या राय सारखे दिसत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. अशातच आता ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या प्राईम व्हिडीओनंही या ट्रेंडमध्ये उडी घेतली आहे. वामिका गब्बी हुबेहुब ऐश्वर्या रायसारखी दिसत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. प्राईम व्हिडीओनं त्याच्या ट्विटर हँडलवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये डाव्या बाजूला ऐश्वर्या राय आणि उजवीकडे वामिका गब्बी असल्याचं पाहायला मिळत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मनं प्राईम व्हिडीओनं "हा हमें भी यही लगता है" या मथळ्यासह ट्विट शेअर केलं आहे.
नेटकऱ्यांमध्ये रंगल्या चर्चा
प्राईम व्हिडीओनं ट्विट करताच या ट्विटवर सर्वांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहीजण म्हणाले की, ऐश्वर्याच्या सौंदर्याला तोड नाही, तर दुसरीकडे काहीजण म्हणतायत की, हा फक्त योगायोग आहे, तसं पाहायला गेलं तर, ती काहीशी ऐश्वर्यासारखी दिसते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की, ऐश्वर्याची मुलगी जर ऐश्वर्यावर गेली असती, तर ती हुबेहुब वामिकासारखी दिसली असती.
yeah we see it too 😍💙#WamiqaGabbi #AishwayaRaiBachchan pic.twitter.com/OUmnYMCf9p
— prime video IN (@PrimeVideoIN) December 25, 2024
विश्वसुंदरी म्हणून ओळखली जाते, ऐश्वर्या...
विश्वसुंदरी म्हणून ओळखली जाणारी ऐश्वर्या रायला सर्वात शेवटी मणिरत्नम चित्रपटात दिसून आली होती. पोन्नियिन सेलवन पार्ट I आणि पार्ट II मध्ये दिसून आली होती. तसेच, वामिका सध्या वरुण धवन आणि कीर्ति सुरेश यांच्यासोबत बेबी जॉनमध्ये दिसून आली होती. वामिकाचं बेबी जॉनमध्ये तिनं साकारलेल्या भूमिकेसाठी खूप कौतुक झालं. पण, बेबी जॉन बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडू शकला नाही.
View this post on Instagram
वामिकानं यापूर्वी 'जुबली', 'ग्रहण', 'चार्ली चोपड़ा एंड द मिस्ट्री ऑफ सोलंग वैली' आणि 'माई' यांसारख्या शोमध्ये डिजिटल फॉर्मेटमध्ये आपल्या अभिनयानं सिनेप्रेमिना इंप्रेस केलं आहे. तिनं नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आलेली फिल्म 'खुफिया'मधूनही आपली छाप सोडली. त्यानंतर हिंदीमध्ये 'दिल का दरवाजा खोल ना डार्लिंग', पंजाबी मध्ये 'किकली' आणि तमिळमध्ये 'जिनी'मध्ये दिसून आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
"मला खोटं बोलून, माझं नाव वापरलेलं मला आवडणार नाही..."; कोकण हार्टेड गर्ल संतापली, नेमकं घडलं काय?