Pushpa 2 Box Office Collection Day 25: एकट्या 'पुष्पा 2'ची कमाई किंग खानच्या दोन ब्लॉकबस्टर फिल्म्सच्या बरोबरीत; एकूण कलेक्शनचा आकडा किती?
Pushpa 2 Box Office Collection Day 25: अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा 2 नं चौथ्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर कमाईचा नवा विक्रम रचला आहे. अजूनही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घौददौड सुरूच आहे.
Pushpa 2 Box Office Collection Day 25: इंडियन बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपला नंबर 1 ची जागा मिळवल्यानंतर अल्लू अर्जुनची (Allu Arjun) फिल्म 'पुष्पा 2' (Pushpa 2 The Rule) आता सर्वांपेक्षा अव्वल ठरली आहे. हे आम्ही नाहीतर चित्रपटाच्या कमाईचे आकडे सांगत आहेत.
सर्वात आधी चित्रपटानं देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'बाहुबली 2: द कन्क्लूजन'ला मागे टाकलं. 2017 मध्ये रिलीज झालेल्या प्रभासच्या या चित्रपटानं 1030.42 कोटींची कमाई केली होती. पुष्पा 2 नं यापेक्षा जवळपास 120 कोटी रुपये अधिक कमावले आहेत. त्यामुळे आता पुष्पानं किंग खानलाही मागे टाकलं आहे.
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन
सुकुमार दिग्दर्शित पुष्पा 2 या चित्रपटानं पेड प्रिव्यूमधून 10.65 कोटी रुपये कमावले होते. यानंतर, आपण सुरुवातीच्या दिवसापासून आज 25 तारखेपर्यंत सकाळी 10:30 पर्यंत बॉक्स ऑफिसचे आकडे सविस्तर पाहुयात...
दिवस | कमाईचे आकडे (कोट्यवधी रुपयांमध्ये) |
पहिला दिवस | 164.25 |
दुसरा दिवस | 93.8 |
तिसरा दिवस | 119.25 (शनिवार) |
चौथा दिवस | 141.05 |
पाचवा दिवस | 64.45 |
सहावा दिवस | 51.55 |
सातवा दिवस | 43.35 |
आठवा दिवस | 37.45 |
नववा दिवस | 36.4 |
दहावा दिवस | 63.3 (शनिवार) |
अकरावा दिवस | |
बारावा दिवस | |
तेरावा दिवस | |
चौदावा दिवस | |
हे आकडे SACNILC नुसार आहेत, ही वेब साईट बॉक्स ऑफिस आकड्यांचा डेटा ठेवते आणि अंतिम नाही. यामध्ये बदल होऊ शकतात.
'पुष्पा 2' 1200 कोटी कमावणारा पहिला चित्रपट ठरणार?
पुष्पा 2 हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे, त्यामुळे साहजिकच चित्रपटानं आता जी काही कमाई केली आहे, ती बॉक्स ऑफिसवर एका नव्या विक्रमासारखी आहे. चित्रपटानं आज 1150 कोटींचा टप्पा ओलांडल्यानंतर, चित्रपट लवकरच 1200 कोटींची कमाई करेल, अशी आशा निर्मात्यांना आहे.
View this post on Instagram
आश्चर्याची बाब म्हणजे, शाहरुख खानच्या दोन ब्लॉकबस्टर्स जवान (543.09 कोटी) आणि पठाण (640.25 कोटी) यांची कमाई जोडली तर, ती 1183.34 कोटी रुपये होते. आणि पुष्पा 2 हा एक असा चित्रपट असणार आहे, जो एकट्या या दोन चित्रपटांच्या एकूण कमाईपेक्षा जास्त कमाई करणारा ब्लॉकबस्टर ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :