Pushpa 2 Box Office Collection Day 25: चौथ्या रविवारीही बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2'चाच ताबा; छप्पडफाड कमाई करत रचला नवा विक्रम, कलेक्शनचा आकडा 1150 कोटी पार
Pushpa 2 Box Office Collection: पुष्पा 2 चं बॉक्स ऑफिसवरचं वादळ काही क्षमण्याचं नाव घेत नाही. या चित्रपटानं चौथ्या वीकेंडलाही कमाल केली असून धमाकेदार कलेक्शनही केलं आहे.
Pushpa 2 Box Office Collection Day 25: सुकुमार दिग्दर्शित अल्लू अर्जुन (Allu Arjun), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि फहद फासिल (Fahadh Faasil) स्टारर 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) रिलीज होऊन जवळपास एक महिना झाला आहे. बॉक्स ऑफिसवर (Box Office) या चित्रपटाचं वादळ अजूनही क्षमलेलं नाही. चौथ्या वीकेंडलाही या चित्रपटानं बक्कळ गल्ला जमवला आहे. आणि यासोबतच चौथ्या रविवारी पुष्पानं आणखी एक मोठा टप्पा पार केला आहे.
'पुष्पा 2: द रुल'ची 25 व्या दिवसाची कमाई किती?
'पुष्पा 2: द रुल' बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं इतिहास रचला आहे आणि सर्व बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले असून देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. एवढंच नाही तर या चित्रपटानं इतकं मोठं कलेक्शन केलं आहे की, आता या चित्रपटाचा विक्रम मोडणं, हे आगामी चित्रपटांसाठी कठीण असेल. विशेष म्हणजे, 'पुष्पा 2: द रुल' चौथ्या विकेंडलाही अव्वल ठरल्याचं स्पष्ट झालं आहे. या 25 दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या चित्रपटानं 6 दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या वरुण धवनच्या बेबी जॉनलाही मागे टाकलं आहे.
View this post on Instagram
'पुष्पा 2: द रुल'च्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर पहिल्या आठवड्यात चित्रपटानं 725.8 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटानं 264.8 कोटींची कमाई केली आणि तिसऱ्या आठवड्यात चित्रपटानं 129.5 कोटींची कमाई केली. तर 'पुष्पा 2: द रुल'नं 23व्या दिवशी 8.75 कोटी रुपये आणि 24व्या दिवशी 12.5 कोटी रुपये कमावले. यासह, आता चित्रपटाच्या रिलीजच्या 25 व्या दिवसांच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
- सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2'नं रिलीजच्या 25 व्या दिवशी 28 टक्क्यांच्या वेगानं 16 कोटींचा गल्ला केला आहे.
- यासह, 'पुष्पा 2: द रुल'ची 25 दिवसांची एकूण कमाई आता 1157 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
- यामध्ये चित्रपटानं तेलगूमध्ये 324.99 कोटी रुपये, हिंदीमध्ये 753.9 कोटी रुपये, तामिळमध्ये 56.75 कोटी रुपये, कन्नडमध्ये 7.6 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 14.11 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'पुष्पा 2: द रुल' 1200 कोटींच्या क्लबपासून किती दूर ?
'पुष्पा 2: द रुल' बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. चौथ्या वीकेंडमध्येही चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आणि जबरदस्त कलेक्शनसह चित्रपटानं 1150 कोटींचा आकडा पार केला आहे. आता 1200 कोटींचा आकडा गाठण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. चित्रपट ज्या गतीनं कमाई करत आहे, ते पाहता चौथ्या आठवड्यात हा चित्रपट 1200 कोटींचा मैलाचा दगड पार करेल आणि अशी कमाई करणारा पहिला चित्रपट ठरेल, असं चित्र दिसत आहे. सध्या सर्वांच्या नजरा बॉक्स ऑफिसवर खिळल्या आहेत. चौथ्या आठवड्यात 'पुष्पा 2: द रुल' कशी कामगिरी करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :