एक्स्प्लोर

कॅनडाच्या OIFFA 2021 अवॉर्डमध्ये मराठीचा डंका, सोलापूरचा अक्षय इंडीकर ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

Ottawa Indian Film Festival : गेल्या एक दशकापासून कॅनडाची राजधानी असलेल्या Ottawa येथे Ottawa Indian Film Festival होत असतो. यंदाही या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड सोलापूरच्या अक्षय इंडीकर यांना मिळाला आहे.

Ottawa Indian Film Festival : गेल्या एक दशकापासून कॅनडाची राजधानी असलेल्या Ottawa येथे Ottawa Indian Film Festival होत असतो. यंदाही या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये यावर्षी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड सोलापूरच्या अक्षय इंडीकर यांना मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारसोबतच स्थलपुराण या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार नील देशमुख या बालकलाकारास मिळाला आहे. 

अक्षयला मिळालेला हा बहुमान ही मराठी सिनेसृष्टीसाठीच नव्हे तर अवघ्या भारतीय सिनेजगतासाठी अभिमानाची बाब आहे. अक्षयच्या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अत्यंत नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवली आहे. 

PHOTO : 'IFFLA'मध्ये मराठमोळ्या अक्षय इंडीकरची मुलाखत घेणार बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप

यामध्ये 'त्रिज्या' सिनेमाला नुकताच 'बेस्ट साउंड डिजाईन'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अशियाई चित्रपट आणि बेस्ट भारतीय दिग्दर्शक असे दोन मोठे पुरस्कार देखील मिळाले आहेत. आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ख्याती असलेला 'यंग सिनेमा अवॉर्ड' हा पुरस्कार देखील अक्षय इंडीकरला मिळालेला आहे.

जागतिक सिनेमाच्या प्रतिष्ठित यादीत मराठमोळ्या अक्षय इंडीकरच्या 'स्थलपुराण'चा समावेश

भाषेची प्रदेशिकतेची बंधनं ओलांडून मराठी सिनेमा महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या बाहेर घेऊन जाता आलं याचा आनंद आहे, सिनेमालाभाषा नसते तर सिनेमा हीच त्यांची भाषा असते असं एबीपी माझाशी बोलताना अक्षय ने सांगितले, सोबतच निर्माते, संजय शेटे, कॅमेरामन, सर्व टीमचं यश आहे असंही अक्षयनं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 

बर्लिन चित्रपट महोत्सवात मराठमोळ्या 'स्थलपुराण'चा डंका, रेड कार्पेटचा सन्मान

लॉस एंजेलिसच्या IFFLA फेस्टिवलमध्ये 'स्थलपुराण' क्लोजिंग फिल्म दाखवली गेल्यानंतर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनं अक्षयचं भरभरुन कौतुक केलं होतं. इतकंच काय अनुराग स्वत: अक्षयला भेटण्यासाठी त्याच्या घरी देखील गेला होता. अक्षयनं याबाबतचा अनुभव सोशल मीडियावर शेअर देखील केला होता. अनुरागनं अक्षय इंडीकरची मुलाखत घेऊन त्याचा आतापर्यंचा प्रवास उलगडला. त्यात अक्षयने पुढील चित्रपट 'Construction' हा घेऊन येत असल्याचं देखील म्हणलं आहे.

WEB EXCLUSIVE मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकरला आशिया यंग सिनेमा अवॉर्ड जाहीर, अक्षयसोबत फिल्मी गप्पा!

आजपर्यंत 28 ते 29 देशामध्ये अक्षय इंडीकर आणि त्यांची टीम त्यांचे चित्रपट जगभरातल्या मराठी प्रेक्षकांपर्यंत घेऊन गेले आहेत. या गोष्टीचा अभिमान वाटत असल्याचं देखील अक्षयने सांगितलं.

एबीपी माझा मध्ये 2020 ते 2025 सहा वर्ष Associate Producer पदावर कामाचा अनुभव, मागील काही वर्षांपासून Multimedia, Edit, Shoot, Graphics, Social Media तसेच टेक गॅजेट्स, मनोरंजन, सिनेमा, पब्लिसिटी विविध क्षेत्रात कामाचा अनुभव, सामाजिक तसेच ट्रेंडिंग विषयांवर ब्लॉग लेखन!  डायनॅमिक मीडिया प्रोफेशनल, व्हिडिओ प्रोडक्शन, एडिटिंग आणि कंटेंट मॅनेजमेंटमध्ये प्रत्यक्ष अनुभव, स्क्रिप्ट लेखन, SEO, YouTube ऑपरेशन्स आणि लेखन यामध्ये प्रावीण्य, विशेषतः मनोरंजन आणि ट्रेंडिंग बातम्या या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित. ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया, ChatGPT, AI-आधारित टूल्सवर प्रावीण्य!

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full : महायुतीचा जोमात प्रचार, मविआचे बडे नेते मात्र प्रचारापासून दूरच; कारण काय?
Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मोठी बातमी! 8 फेब्रुवारीची परीक्षा रद्द, शिष्यवृत्ती परीक्षेची नवी तारीख जाहीर; राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
भाजप उमेदवारांना निवडून द्या, तुमचा 'तो' प्रश्न मार्गी लावतो; बावनकुळेचं फोनवरुन लोणावळ्यात आश्वासन
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
मोठी बातमी! महापालिका मतदार याद्यांतील घोळ समोर, सूचना व हरकतीला मुदतवाढ; निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Embed widget