एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बर्लिन चित्रपट महोत्सवात मराठमोळ्या 'स्थलपुराण'चा डंका, रेड कार्पेटचा सन्मान

स्थलपुराणच्या प्रदर्शनानंतर जागतिक चित्रपट प्रेमी आणि समीक्षकांनी चित्रपटाचा विषय आणि त्याची मांडणी याचे तोंडभरून कौतुक केले. युरोपियन फिल्म मार्केटमध्ये 10 जणांनी स्थलपुराण विकत घेण्याची इच्छा दाखवली.

पणजी : गोव्यातील विन्सन वर्ल्ड निर्मित अक्षय इंडीकर दिग्दर्शित स्थलपुराण या मराठी सिनेमाचे प्रतिष्ठित बर्लिन महोत्सवातील चारही शो हाउसफुल्ल झाले आहेत. चित्रपट प्रेमी आणि समीक्षकांनी स्थलपुराणचे तोंडभरून कौतुक देखील केले. चित्रपटाचे निर्माते संजय शेट्ये आणि दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना दोनवेळा रेड कार्पेटचा सन्मान देखील मिळाला आहे. प्रतीक वत्स यांचा 'एब आले ऊ!', पुष्पेंद्र सिंग यांचा 'लैला और सात गीत' आणि अक्षय इंडीकर यांचा 'स्थलपुराण – जुनाट जागा' या तीन चित्रपटांची यंदा भारतातर्फे बर्लिन महोत्सवासाठी निवड झाली होती. यातील स्थलपुराणला जागतिक रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अक्षय इंडीकर यांचा मराठी चित्रपट 'स्थलपुराण' हा आठ वर्षाच्या दिघूची कथा सांगतो. वडील बेपत्ता झाल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी तो तळमळीने प्रयत्न करतो. पण शेवटी शोध न लागल्याने कोकणात आयुष्याच्या संघर्षासह आजी-आजोबांबरोबर राहायला जातो. चित्रपटाच्या कथेतील बदल आणि होणारा तोटा या दोन्ही बाजू या चित्रपटाद्वारे दाखविण्यात आल्या आहेत. बर्लिन चित्रपट महोत्सवात मराठमोळ्या 'स्थलपुराण'चा डंका, रेड कार्पेटचा सन्मान बर्लिन येथून बोलताना स्थलपुराणचे निर्माते संजय शेट्ये म्हणाले, तब्बल 15 हजार सिनेमांमधून स्थलपुराणची बर्लिन चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली होती. 26 फेब्रुवारी रोजी स्थलपुराणचा वर्ल्ड प्रीमियर झाला. त्यानंतर 27, 28 आणि 29 फेब्रुवारी रोजी रोज एक याप्रमाणे स्थलपुराणचे एकूण चार शो दाखवण्यात आले. हे सर्व शो हाउसफुल्ल झाले. 26 आणि 29 फेब्रुवारीच्या शो वेळी आम्हाला रेड कार्पेटचा सन्मान मिळाला. हा फक्त आमचा नव्हे तर सर्व गोमंतकीयांचा सन्मान होता. स्थलपुराणला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत. स्थलपुराणच्या प्रदर्शनानंतर जागतिक चित्रपट प्रेमी आणि समीक्षकांनी चित्रपटाचा विषय आणि त्याची मांडणी याचे तोंडभरून कौतुक केल्याचे सांगून शेट्ये म्हणाले, इफ्फीमध्ये एनएफडीसीचा फिल्म बाजार असतो तशाच धर्तीवर बर्लिन महोत्सवात युरोपियन फिल्म मार्केट असतं. यात सहभागी जवळपास 10 जणांनी स्थलपुराण विकत घेण्याची इच्छा दाखवली आहे. बर्लिन चित्रपट महोत्सवात मराठमोळ्या 'स्थलपुराण'चा डंका, रेड कार्पेटचा सन्मान बर्लिन महोत्सवात स्थलपुराणचा वर्ल्ड प्रीमियर झाल्यामुळे कान्समध्ये धडक देऊन तिथे वर्ल्ड प्रीमियर करण्याची संधी हुकली असली तरी टोरांटो आणि बुसान या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात भाग घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यात नक्की आम्ही यशस्वी होऊ, असा विश्वास दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांनी व्यक्त केला आहे. इंडीकर म्हणाले, आम्ही स्थलपुराणसाठी घेतलेली मेहनत सार्थकी लागली. स्थलपुराणच्या शो नंतर झालेली प्रश्नोत्तरे तब्बल पाऊण तास रंगली. सिनेमाचा विषय आणि त्याची मांडणी हटके झाली असून त्याची दखल बर्लिन महोत्सवात घेतली गेल्यामुळे आमचे स्वप्न सत्यता उतरले असल्याचा आनंद आम्हाला झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Embed widget