एक्स्प्लोर
जागतिक सिनेमाच्या प्रतिष्ठित यादीत मराठमोळ्या अक्षय इंडीकरच्या 'स्थलपुराण'चा समावेश
जागतिक सिनेमांच्या प्रतिष्ठित यादीत आता मराठी सिनेमाने स्थान मिळवलं आहे. मराठमोळ्या अक्षय इंडीकरच्या 'स्थलपुराण' या चित्रपटाचा यात समावेश झाला आहे.
मुंबई : जागतिक सिनेमातील दर्जेदार चित्रपटांची संकलित यादी बनवणाऱ्या mubi.com या प्रतिष्ठित संकेतस्थळावर दिग्दर्शक अक्षय इंडीकर याच्या 'स्थलपुराण' (Chronicle of Space) या फिल्मला स्थान मिळाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही 'स्थलपुराण'नं समीक्षकांची दाद मिळवली होती.
डॅनियल सॅमन या मान्यवर चित्रपट समीक्षकांनी ही यादी तयार केली आहे. अमेरिकेतून प्रसिद्ध होणारी ही यादी जागतिक सिनेमा विश्वात महत्वाची मानली जाते. या यादीत साय मिंग यांग, आबेल फेररास हाँग साँग यू अशा मान्यवर आणि 'कांस'सारख्या आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवात सन्मानित दिग्दर्शकांच्या चित्रपटांसोबत अक्षयच्या 'स्थलपुराण'ची घेतली गेलेली दखल म्हणूनच कौतुकास्पद आहे. संजय शेट्ये यांनी 'स्थलपुराण'ची निर्मिती केली आहे.
COVID-19 | हेल्थ वर्कर्सना प्रियांका चोप्राची मदत; 20 हजार बुटांचं वाटप
मूळच्या सोलापुरातील अक्षयनं चित्रपटसृष्टीत पदार्पणातच आंतरराष्ट्रीय मंच गाजवले आहेत. यापूर्वी अक्षयच्या नावे ‘त्रिज्या’ या मराठी चित्रपटाला चीनमधल्या 22व्या शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिल्या पाचांमध्ये स्थान, 'न्यू एशियन टॅलेंट'साठी नामांकन आणि बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'क्रिस्टल बेअर'साठी नामांकन असे सन्मान आहेत. अक्षयनं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनावरील माहिती-कथनात्मक फिल्म 'उदाहरणार्थ नेमाडे'चेही दिग्दर्शन केलं आहे. त्याच्या 'डोह' या शॉर्ट फिल्मचीही दखल घेतली गेली होती.
स्थलपुराण ही कोकणातील एका गावात घडणारी गोष्ट आहे. गोवा राज्यात चित्रीकरण झालेला हा चित्रपट आठ वर्षाच्या दिघु नावाच्या अतिशय लोभसवाण्या मुलाची गोष्ट सांगतो. वडिलांच्या शोधात अनुभवलेल्या अनेक घटनांचा साक्षिदार बनणारा दिघु हा निसर्गाला आजूबाजूच्या जगाला, जन्म मृत्यूच्या चक्राला स्वतःच्या पातळीवर समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या प्रयत्नांचा ठाय लयीत घेतलेला वेध म्हणजे हा चित्रपट. अतिशय दर्जेदार छायांकन असलेला हा सिनेमा प्रत्येकाच्या बालपणी घडलेल्या आठवणींना जागं करतो. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेलता चारही शोला रसिकांची प्रचंड गर्दी झाली आणि सगळे शो हाऊसफुल होऊन निर्माता आणि दिग्दर्शक यांना रेड कार्पेटचा सन्मान देखील मिळाला होता.
नील देशमुख ह्या छोट्या मुलाने पहिल्यांदाच कॅमेऱ्या समोर काम केले आहे सोबत रेखा ठाकूर, अनुश्री वाणी, शशांक शेंडे यांच्या अतिशय नैसर्गिक वावराने हा चित्रपट एकाद्या वास्तवातील घटनेप्रमाणे भासू लागतो. दिघुच्या डायरीतील नोंदीच्या मार्फत उलगडणारी ही कथा अनेक सुंदर गोष्टींना साक्षीदार बनवते सहज सोप्या भाषेत जगण्याचं तत्वज्ञान सांगत शाळेपेक्षा शाळेचा रस्ता सुंदर असतो ह्या सारख्या ओळी ह्या सिनेमाला अधिकच समृद्ध करतात.
Coronavirus | राज ठाकरेंच्या मागणीमागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? : सामना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement