एक्स्प्लोर

Tumbadachi Manjula Upcoming Marathi Movie: अर्धवट बंद दाराआड एक गूढ चेहरा, दोन्ही कवाडांच्यामध्ये अडकलेले हात; मोहिनी घालायला येतेय 'तुंबाडची मंजुळा'

Tumbadachi Manjula Upcoming Marathi Movie: कोकण म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो तो निसर्गरम्य परिसर, नयनरम्य समुद्रकिनारा आणि याचभोवतीने फिरणाऱ्या किती तरी गूढ अशा रहस्यमय कथा आणि सोबतीला गावाकडच्या गजाली. भुता - खेतांवरील चर्चा हा गावाकडच्या माणसांचा कायमच मनोरंजनाचा विषय राहिलेला आहे.

Tumbadachi Manjula Upcoming Marathi Movie: कोकण म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो तो निसर्गरम्य परिसर, नयनरम्य समुद्रकिनारा आणि याचभोवतीने फिरणाऱ्या किती तरी गूढ अशा रहस्यमय कथा आणि सोबतीला गावाकडच्या गजाली. भुता - खेतांवरील चर्चा हा गावाकडच्या माणसांचा कायमच मनोरंजनाचा विषय राहिलेला आहे. यातच वीतभर घडलेल्या गोष्टी हातभर लांब करून सांगणे हा जणू अनेकांचा आवडता छंदच. अशाच काहीशा गूढ वातावरणातली आणि कोकणाच्या परंपरेला साजेशी एक अतिशय रंजक गोष्ट झी स्टुडिओजने आपल्या प्रेक्षकांसाठी आणली आहे. 'तुंबाडची मंजुळा' असे या चित्रपटाचं नाव असून होळीच्या दिवशी सोशल मीडियावरून या चित्रपटाचं आगळं वेगळं मोशन पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ज्यातून चित्रपटाबद्दलची उत्सुकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. एका घराच्या अर्धवट बंद दाराआड दिसणारा एक गूढ चेहरा आणि दोन्ही कवाडांच्यामध्ये अडकलेले काही हात... जणू काय घरातून बाहेर पडायचा ते प्रयत्न करत आहेत हे सांगणारं हे पोस्टर अतिशय औत्सुक्यपूर्ण झालेलं आहे. येत्या 5 जून रोजी म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

विशेष म्हणजे, पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटाद्वारे विविध कोरगावकर या नव्या दमाच्या दिग्दर्शकाचे दिग्दर्शकीय पदार्पण होत आहे. झी स्टुडिओजच्यावतीनं उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात कोण कोण कलाकार असतील? याची नेमकी गोष्ट काय असेल? आणि तुंबाडची ही मंजुळा कोण असेल? या गोष्टी मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहेत. 

या नव्या चित्रपटाबद्दल बोलतांना झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवेलकर म्हणतात की, "मराठी प्रेक्षक हा एकाच वेळी जेवढा आधुनिक विचारसरणीचा असतो तेवढाच तो आपल्या मातीशी, आपल्या मुळांशी जोडलेला असतो. यामुळेच आजच्या काळातही आपल्या गावच्या मातीची, तेथील परंपरेची गोष्ट सांगणारा विषय त्याला कायमच भावतो. मागील वर्षी आम्ही आणलेला 'दशावतार' हा चित्रपट याचं उत्तम उदाहरण. 'तुंबाडची मंजुळा' हा देखील असाच गावाकडचा एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे. सध्या या चित्रपटाचं टीझर पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणलं आहे. हळूहळू यातील इतर बाबी आम्ही प्रसिद्ध करू ज्यातून प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढतच जाईल हे मात्र नक्की. यानिमित्तानं बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला चित्रपट आम्ही घेऊन आलो आहोत याचा विशेष आनंद आहे..."

पहिल्या पोस्टरपासूनच सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालेला 'तुंबाडची मंजुळा' हा सिनेमा येत्या 5 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget