रनौतचं राऊत झालेलं चालेल का?, दादासाहेबऐवजी बाबासाहेब फाळके लिहिल्यानंतर नेटकऱ्यांचा सवाल
कंगनाने साधारण दोन तासांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये ही इंडस्ट्री काही करण जोहर वा त्याच्या वडिलांची नसून ती बाबासाहेब फाळके यांनी सुरूवात करून त्यात इंडस्ट्रीचे अनेक घटक येतात असं म्हटलं आहे.
मुंबई : कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ट्विट करते आहे. तिचं ट्विट आता राष्ट्रीय बातमी बनू लागली आहे. याची कल्पना तिला आहे. पण आता ट्विट करायची हीच घाई तिला संकटात नेणार आहे. कारण घाईत टाईप करण्याच्या नादात ती नाव चुकू लागली आहे.
कंगनाने साधारण दोन तासांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये ही इंडस्ट्री काही करण जोहर वा त्याच्या वडिलांची नसून ती बाबासाहेब फाळके यांनी सुरूवात करून त्यात इंडस्ट्रीचे अनेक घटक येतात असं म्हटलं आहे. खरतर तिला दादासाहेब फाळके म्हणायचं आहे हे उघड आहे. पण नावातल्या चुकीमुळे ज्यांना ही चूक लक्षात आली त्यांनी कंगनावर विनोद करायला सुरूवात केली आहे.
भारताला बाबासाहेब आणि दादासाहेब ही दोन्ही नावं नवी नाहीत. ही नावं अत्यंत अदबीने घेतली जातात. याच नावात कंगनाने घोळ केला आहे. याबद्दल बोलताना मयुरेश चव्हाण म्हणाला, ट्विटरवर कंगनाला ब्लु टीक आहे. ती टिक त्यालाच असते ज्याला लोक फॉलो करतात. अशावेळी ट्विट करताना तिने जपून ट्विट करायला हवं. यापूर्वीही अशी गल्लत झाली आहे. विकी कौशलचं नाव तिने विकी कौशिक घेतलं होतं. तेव्हा तिला विकी कौशलच म्हणायचं असावं णप अनेकांनी विकी कौशिक कोणी आहे हा हे शोधायला सुरूवात केली होती. एकदा झालेली चूक लक्षात घेऊन कंगनाने ट्विट करताना जरा जपून ट्विट करायला हवं.'
इंडस्ट्री सिर्फ़ करण जोहर/उसके पापा ने नहीं बनाई,बाबा साहेब फाल्के से लेकर हर कलाकार और मज़दूर ने बनाई है,उस फ़ौजी ने जिसने सीमाओं को बचाया,उस नेता ने जिसने संविधान की रक्षा की है,उस नागरिक ने जिसने टिकट ख़रीदा और दर्शक का किरदार निभाया,इंडस्ट्री करोड़ों भारतवासीयों ने बनाई है। https://t.co/klkJlqcJ6C
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 15, 2020
अभिजीत देसाई या तरूणालाही हे आवडलं नाही. तो म्हणाला, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कंगना रानौतचं वाकयुद्ध चालू आहे. तिचं नाव उद्या कुठे टाईप कराताना कंगना रनौतचं चुकून कंगना राऊत झालेलं तिला चालेल का ? दादासाहेब फाळके यांच्याबद्दल संपूर्ण भारताला आदर आहे. सिनेमासृष्टीचे जनक आहेत ते. त्यांचं नाव लिहिताना आपण कुठे चुकत तर नाही ना हे तिने पाहायला हवं '
कंगना खूप घाईने बोलते आहे. तिने जरा सबुरीने ध्यावं असा सल्ला तिला धनंजय काजवे यांनी दिला. तो म्हणाला, कंगनाची चूक होऊ शकते. कुणी मुद्दाम असं लिहित नाही. काहीतरी गडबड झाली असेल,. पण नंतर त्यांनी लगेच त्याचं करेक्शन करायला हवं होतं. करेक्शन असा हॅशटॅग वापरून शब्द करेक्ट केला जातो. आपल्याच ट्विटला रिप्लाय करत हे होतं. पण कंगनाने ते केलेंलं नाही. कारण तिला आपली चूक लक्षातच आलेली नाही. ना तिला ती चूक कुणी लक्षात आणून दिली. हे भयंकर आहे. "
संबंधित बातम्या :