Miss Diva Universe 2023 Shweta Sharda: वय फक्त 22 वर्ष... चंदीगढच्या श्वेता शारदानं पटकावला 'मिस दिवा युनिव्हर्स'चा खिताब
श्वेता शारदाने (Shweta Sharda) मिस दिवा युनिव्हर्स 2023 (Miss Diva Universe 2023) चे विजेतेपद पटकावले आहे.
Miss Diva Universe 2023 Shweta Sharda: श्वेता शारदा (Shweta Sharda) या 22 वर्षीय तरुणीनं नुकतेच मिस दिवा युनिव्हर्स 2023 (Miss Diva Universe 2023) चे विजेतेपद पटकावले आहे. मिस दिवा युनिव्हर्स 2023 नंतर श्वेता आता मिस युनिव्हर्स (Miss Universe) स्पर्धेमध्ये सहभाग घेणार आहे. श्वेता शारदा ही चंदीगढची आहे. नुकतीच श्वेताने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या आईबद्दल तसेच तिच्या करिअरबाबत सांगितलं.
लहानपणापासूनच स्टेजवर डान्स परफॉर्मन्स करणारी श्वेता शारदा आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी 2016 मध्ये चंदीगढहून मुंबईला शिफ्ट झाली. तिचे आई-वडील हे 2013 मध्ये वेगळे झाले. श्वेतानं मुलाखतीमध्ये सांगितलं, सिंगल मदर म्हणून केलेल्या प्रवासात आईला संघर्षाचा सामना करावा लागला. माझे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आईनं तिच्या अनेक स्वप्नांचा त्याग केला होता.
View this post on Instagram
श्वेता शारदा यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, सिंगल मदर असूनही माझ्या आईने मला नेहमीच प्रेरणा दिली आणि पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. प्रत्येक अडचणीवर मात कशी करायची हे तिने शिकवले.
श्वेताने सांगितले की, जेव्हा तिने मिस दिवा युनिव्हर्स 2023 चा खिताब जिंकला, तेव्हा ती तिच्या आईशी व्हिडिओ कॉलवर बोलली आणि बोलताना तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले.
श्वेता शारदाने डान्स इंडिया डान्स, डान्स दिवाने, डान्स प्लस, झलक दिखला जा अशा पाच रिअॅलिटी शोमध्ये कोरियोग्राफर म्हणून भाग घेतला होता. श्वेताने डान्स इंडिया डान्स कार्यक्रमातस्पर्धक म्हणून सलमान खानसोबत डान्स करण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याचे सांगितले. श्वेता म्हणाली की, सध्या तिचे संपूर्ण लक्ष मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्यावर आहे. ती या स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी तयारी करत आहे.श्वेताने मुलखतीमध्ये सांगितलं की ती बॉलिवूड लव्हर आहे. तिला भविष्यात अभिनेत्री व्हायचं आहे. आता श्वेता शारदाला मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी अनेकजण शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Miss World 2023: मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा काश्मीरमध्ये होणार; 27 वर्षांनी भारताकडे स्पर्धेचे यजमानपद