एक्स्प्लोर
प्रेक्षकांची चंगळ, आज चार चित्रपट OTT वर रिलीज होणार
आज बॉलिवूडमधले चार सिनेमे OTT प्लेटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. यात विद्या बालनचा शकुंतला देवी, कुणाल खेमूचा लूटकेस, नवाजुद्दीन सिद्दीकीचा रात अकेली है आणि विद्युत जामवालचा यारा या चित्रपटांचा समावेश आहे.
मुंबई : कोरोनामुळं आता लॉकडाऊन वाढतो आहे तर काही ठिकाणी अनलॉक देखील झाला आहे. छोट्या पडद्यावरची चित्रिकरणं सुरू झाली असली तरी मोठे पडदे अर्थात थिएटर्स सुरू व्हायचं अद्याप नाव नाही. या घडामोडी चालू असताना ओटीटी व्यासपीठे मात्र कामाला लागली आहेत. घरबसल्या रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी एमेझॉन प्राईम, डिस्ने हॉटस्टार, नेटफ्लिक्स आता जास्तीत जास्त कंटेंट मिळवण्याच्या मागे लागली आहेत.
आज बॉलिवूडमधले चार सिनेमे OTT प्लेटफॉर्मवर रिलीज होणार आहेत. यात विद्या बालनचा शकुंतला देवी, कुणाल खेमूचा लूटकेस, नवाजुद्दीन सिद्दीकीचा रात अकेली है आणि विद्युत जामवालचा यारा या चित्रपटांचा समावेश आहे. विद्या बालन, नवाजुद्दीन आणि कुणाल खेमूचे हे सिनेमे आज अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स आणि डिज्नी हॉटस्टार अशा प्लेटफॉर्मवर रिलीज होणार आहेत.
Shakuntala Devi Trailer : 'ह्युमन कॉम्पुटर' शकुंतला देवी यांच्या भूमिकेत विद्या बालन, मजेशीर ट्रेलर रिलीज
विद्या बालनचा शकुंतला देवी एक बायोपिक आहे. या सिनेमात विद्या बालन मॅथेमॅटिशियन (गणित तज्ज्ञ) शकुंतल देवी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसलेला विद्या बालनचा लूक तिच्या मागील चित्रपटांपेक्षा एकदम वेगळा आहे. सिनेमात 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रा, अमित साध मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 'ह्युमन कॉम्युटर' नावाने प्रसिद्ध गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्टर शकुंतला देवी यांच्या व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांनी आयुष्यात मिळवलेलं यश हा प्रवास सिनेमात उलगडला जाणार आहे. तर नवाज़ुद्दीन सिद्दीकीचा रात अकेली है मर्डर मिस्ट्रीवर आधारीत सिनेमा आहे. कुणालचा लूटकेस कॉमेडी चित्रपट आहे.
शेतकऱ्याच्या पैलवान मुलाचे राजकारणातील डावपेच! 'मै मुलायम सिंह यादव’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
लॉकडाऊन वाढू लागल्यानंतर अनेक सिनेमावाल्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. अमेझॉन प्राईमने याआधी गुलाबो सिताबो थेट रिलीज तरून धमाका उडवून दिला. त्यानंतर सुशांतसिंहचा दिल बेचारा हॉटस्टारवर रिलिज झाला. ओटीटीवर असलेली गरज लक्षात घेऊन या सिनेमांचे ट्रेलर, प्रोमो बनवण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement