एक्स्प्लोर
आता नेटफ्लिक्सचा बंपर धमाका, दहा चित्रपट करणार रिलीज
डिस्ने हॉटस्टारने 7 सिनेमे दाखवण्याचं जाहीर केल्यानंतर आता नेटफ्लिक्सनेही 10 सिनेमे घेतले आहेत.यातला कोणता सिनेमा कधी रिलीज होणार ते नेटफ्लिक्स उद्या जाहीर करणार आहे.
मुंबई : लॉकडाऊन वाढतो आहे. छोटा पडद्यावरची चित्रिकरणं सुरू झाली असली तरी मोठे पडदे अर्थात थिएटर्स सुरू व्हायचं अद्याप नाव नाही. ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनीही नुकतंच ट्विट करून या वर्षात काही थिएटर्स उघडणार नसल्याचं भाकित केलं आहे. या घडामोडी चालू असताना ओटीटी व्यासपीठे मात्र कामाला लागली आहेत. घरबसल्या रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी एमेझॉन प्राईम, डिस्ने हॉटस्टार, नेटफ्लिक्स आता जास्तीत जास्त कंटेंट मिळवण्याच्या मागे लागली आहेत. अशात आता नेटफ्लिक्स आपल्याकडचे १० सिनेमे लोकांसाठी खुले करणार आहे. कोणता सिनेमा कधी रिलीज होईल ते मात्र १६ जुलैला नेटफ्लिक्स सागणार आहे.
डिस्ने हॉटस्टारने काही दिवसांपूर्वी आपल्याकडचे ७ सिनेमे जाहीर केले होते. दिल बेचारा, शकुंतला देवी, लक्ष्मी बॉम्ब आदी सिनेमांचा यात समावेश होतो. ही घोषणा झाल्यानंतर या ओटीटीचे प्रतिस्पर्धी असलेलं नेटफ्लिक्स काय करतं याकडे अनेकांचं लक्ष होतं. आता या नेटफ्लिक्सने दहा सिनेमांची यादी जारी केली आहेय याच्यात एके व्हर्सेस एके, गुंजन सक्सेना, लुडो, डॉली किटी और वह चमकते सितारे, गिन्नी वेडस सनी, तोरबाज, इंदु की जवानी, द गर्ल ऑन द ट्रेन, रात अकेली है, यांसह अनुराग कश्यपच्या एका सिनेमाचा समावेश होतो. अनिल कपूर, राजकुमार राव, अभिषेक बच्चन, भूमी पेडणेकर, कोकणा सेन शर्मा, राधिका आपटे, नवाजुद्दिन सिद्दीकी, परिणिती चोप्रा आदी अनेक चमकते तारे या सिनेमातून आपल्याला भेटणार आहेत. यात सर्वप्रकारच्या सिनेमाचा भरणा आहे. लो बजेट.. सिनेमांसोबत विविध विषयांचा भरणा या सिनेमांमध्ये असणार आहे. कोणता सिनेमा कोणत्या दिवशी रिलीज होईल ते मात्र 16 तारखेला कळणार आहे.
लॉकडाऊन वाढू लागल्यानंतर अनेक सिनेमावाल्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधार घेतला. एमेझॉन प्राईमने गुलाबो सिताबो थेट रिलीज तरून धमाका उडवून दिला. ओटीटीवर असलेली गरज लक्षात घेऊन या सिनेमाचा ट्रेलर, प्रोमो बनवण्यात आले होते. त्याला रसिकांचा प्रतिसाद मिळालेला पाहून डिस्ने हॉटस्टारने सात सिनेमांची घोषणा केली. या वर्षासाठी तब्बल एक हजार कोटींची गुंतवणूक हॉटस्टार करणार असल्याचं वृत्त आहे. आता त्याच्या तोडीला नेटफ्लिक्सही उतरलं आहे. डिस्ने हॉटस्टारने आपल्या सातही सिनेमांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्याची सुरूवात २४ जुलैपासून होणार आहे. सुशांतसिंह राजपूतची मुख्य भूमिका असलेला मुकेश छाब्रा दिग्दर्शित दिल बेचारा या सिनेमापासून याची सुरूवात होणार आहे. आता हॉटस्टारने आपल्या तारखा जाहीर केल्या असल्याने नेटफ्ललिक्स कोणत्या ताऱखा देतं हे पाहाणं उत्सुकतेचं ठरेल. नेटफ्लिक्सनेही जर त्याच तारखा जाहीर केल्या तर एरवी शुक्रवारी थिएटरवर पाहायला मिळणारी मारामारी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळेल. अर्थात, त्यातून प्रेक्षकांची चंगळ असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement