Shah Rukh Khan : ‘कुछ कुछ होनेवाला है’, ‘रोमान्स किंग’ शाहरुख खान लाँच करणार नवा ओटीटी प्लॅटफॉर्म!
Shah Rukh Khan OTT Platform : शाहरुख खानने वर्षभरापूर्वी त्याच्या OTT पदार्पणाचा एक टीझर व्हिडीओ देखील शेअर केला होता. परंतु, आता किंग खान याची अधिकृत घोषणा करणार आहे.
Shah Rukh Khan OTT Platform : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) OTT वर कधी एण्ट्री करणार याची चाहते आतुरतेने वाट बघत होते. शाहरुख खानने वर्षभरापूर्वी त्याच्या OTT पदार्पणाचा एक टीझर व्हिडीओ देखील शेअर केला होता. परंतु, आता किंग खान याची अधिकृत घोषणा करणार आहे. मंगळवारी (15 मार्च) शाहरुख खानने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो ‘थम्प्स अप’ करताना दिसत आहे आणि या पोस्टरवर लिहिले आहे, ‘SRK +’.
या फोटोवरून आता हे स्पष्ट झालं आहे की, ‘रोमान्स किंग’ एक नवा ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. अभिनेता सलमान खानने (Salman Khan) देखील ट्विट करत शाहरुख खानला शुभेच्छा दिल्या आहेत.
ड्रग्ज केसमुळे अडकला शाहरुखचा प्रोजेक्ट!
गेल्या वर्षी शाहरुख खान ओटीटीवर पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, शाहरुख खानने डिस्ने प्लस हॉटस्टारवर पदार्पण करण्याचे संकेत देणारे काही टीझर व्हिडीओ शेअर केले होते. त्यावेळी असे म्हटले जात होते की, तो लवकरच एक मोठी घोषणा करू शकेल. मात्र, त्याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्याने हा संपूर्ण प्रकल्प पुढे ढकलण्यात आला. आता शाहरुख खानने या पोस्टद्वारे चाहत्यांना पुन्हा एकदा हिंट दिली आहे. फोटो पोस्ट करताना शाहरुख खानने लिहिले की, ‘OTT च्या जगात काहीतरी घडणार आहे.’
चाहत्यांची उत्कंठा शिगेला!
शाहरुख खानने ही पोस्ट शेअर करताच अल्पावधीतच सोशल मीडियावर अनेक लाईक्स आले. शाहरुख खानच्या OTT पदार्पणाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. किंग खानचा मुलगा आर्यन या माध्यमातून एका वेब सीरीजमध्ये लेखक म्हणून डेब्यू करू शकतो, अशी देखील चर्चा सुरु आहे.
हेही वाचा :
- The Kashmir Files Box Office Collection Day 4: आठवड्याच्या पहिल्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिसली ‘द काश्मीर फाईल्स’ची जादू!
- Alia Bhatt : ‘शेरशाह’साठी कियारा नव्हे आलियाला होती पहिली पसंती!
- Kapil Sharma : खरंच कपिल शर्माने ‘द काश्मीर फाईल्स’चं प्रमोशन करणं टाळलं? पाहा काय म्हणाले अनुपम खेर...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha